ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
reasons-for-greying-hair-in-marathi

केस पांढरे होण्याची कारणे | Reason For Greying Hair In Marathi

वाढत्या वयासह केस पांढरे होणं हे अत्यंत नॉर्मल मानले जाते, पण कमी वयातही केस पांढरे होऊ लागले तर मात्र तुम्हाला नक्कीच यावर विचार करावा लागतो. हल्ली शाळेत जाणाऱ्या मुलांचेही केस पांढरे होऊ लागल्याचे दिसून येते. अर्थात अगदी लहान वयापासून केस पांढरे असण्याची समस्या अनेकांना सतावत आहे. पांढरे केस दिसून लागल्यानंतर आपण सगळेच याच्या उपचाराच्या मागे लागतो. पण नक्की केस पांढरे का होतात अथवा केस पांढरे होण्याची कारणे व उपाय काय आहेत याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. केस पांढरे होण्याची कारणे (Kes Pandhare Honyachi Karane) समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः आपली बदलती लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणावाखाली असणारे आयुष्य हे महत्त्वाचे कारण मानले जाते. वास्तविक आपले डाएट आणि आपल्या सवयी यासाठी जबाबदार आहेत याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. मात्र याव्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊया.  

केसांमध्ये रंग कसा येतो?

केसांमध्ये रंग कसा येतो? -केस पांढरे होण्याची कारणे
केसांमध्ये रंग कसा येतो?

आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, केसांचा रंग नक्की बदलतो कसा? तर आपल्या शरीरामध्ये तीन पिगमेंट असतात. हिमोग्लोबिन (Hemoglobin), कॅरॉटिनॉईड (Carotenoid) आणि मेलानिन (Melanin). केस आणि त्वचेचा रंग हा आपल्या पिगमेंटनुसार निर्धारित होत असतो. 

  • मेलानिनचे निर्माण हे मेलानोसाईट्सद्वारे होत असते, जे त्वचेच्या वरील बाजूला असतात. यामुळे केस वाढण्यास मदत मिळते
  • हेअर फॉलिकल्समध्ये दोन प्रकारचे मेलानिन असतात, इमेलानिन आणि फोमेलेनिन
  • इमेलानिन हे केसांना काळा अथवा चॉकलेटी रंग प्रदान करते 
  • फोमेलेनिन हे केसांना सोनेरी अथवा पांढरा रंग प्रदान करते

केस पांढरे होण्याची कारणे – Kes Pandhre Honyachi Karne Marathi

वय वाढते त्यानुसार केस पांढरे होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा कमी वयात केस पांढरे होतात, तेव्हा केस पांढरे होण्याची कारणे नेमकी काय आहेत याचा विचार सुरू होतो आणि हा एक चिंतेचा विषयदेखील होतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन नावाच्या पिगमेंटमुळे असतो. मेलानिन पिगमेंट हे केसांच्या मुळाशी असतात. पण जेव्हा मेलानिन बनणे बंद होते तेव्हाच केस पांढरे होऊ लागतात. हे केस पांढरे होण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. मात्र मेलानिन बनणे बंद का होते आणि याशिवाय केस पांढरे होण्याची अन्य कारणे काय आहेत याबाबतही माहिती असायला हवी. 

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे
कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे

आजकाल अगदी लहान वयातच अनेक मुलामुलींचे केस पांढरे झालेले दिसून येतात. याची काही महत्त्वाची कारण आहेत. ती नक्की काय आहे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

विटामिन डी (Less Vit-D) ची कमतरता असू शकते केस पांढरे होण्याचे कारण

अनेक जणांच्या शरीरामध्ये आजकाल विटामिन डी ची कमतरता दिसून येते. यामुळे हाडे मजबूत राहात नाहीत हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण याचा परिणाम केस पांढरे होण्यावरही होतो हे तुम्हाला माहीत आहे का? हो हे खरं आहे. विटामिनची गरज केवळ निरोगी शरीर राहण्यासाठीच नाही तर केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठीही तितकेच गरजेचे आहे. अनेक शोधानंतर अशी माहिती मिळाली आहे की, तुमच्या शरीरामध्ये विटामिन बी – 6, बी – 12, बायोटिन, विटामिन डी अथवा विटामिन ई ची कमतरता असेल तर वेळेआधीच तुमचे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही अगदी लहानपणापासून योग्य विटामिन्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायला हवा. 

अनुवंशिक कारण (Hereditary) असू शकते केस पांढरे होण्याचे कारण

कमी वयात केस पांढरे होणे यासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता. 2013 मध्ये प्रकाशित इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी, न्युरोलॉजी आणि लेप्रोलॉजीनुसार, आजकाल अनेक जणांचे केस वेळेआधीच पांढरे होतात. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण मानले गेले आहे ते म्हणजे आनुवंशिकता. तुमच्या कुटुंबामध्ये केस पांढरे होण्याची अथवा केस गळण्याची समस्या असेल तर ते अनुवंशिकतेनुसार तुमच्याकडे येते. यावर तुम्ही लहानपणापासूनच केसांची योग्य काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे. 

अति तणाव (Stress) घेतल्याने होतात केस पांढरे

Effects of stress on your skin and hair in Marathi
केस पांढरे होण्याची कारणे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच आयुष्यात तणाव असतो.  याशिवाय झोप अपूर्ण राहणे ही गोष्टही त्याला कारणीभूत ठरते. नोकरी असो वा व्यवसाय अनेकदा प्रत्येक गोष्टीसाठी अनेक जण तणावाखाली राहतात. सतत विचार करत राहिल्यामुनळे ब्रेन सेल्सवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे वयाच्या आधीच केस पांढरे होऊ लागतात. याशिवाय सध्या मोबाईल आणि इतर गॅजेट्सचा वापर इतका वाढला आहे की, झोप पूर्ण होत नाही. तसंच तणावग्रस्त राहिल्यावरही झोप येत नाही. या सगळ्याचा परिणाम सरळ केसांवरच होतो. त्यामुळे सुंदर आणि निरोगी केस हवे असतील तर तुम्ही तणावरहित राहणे अत्यंत गरजेचे आहे. 

केसांना कमी तेल लावणे (Less Oil In Hair) हे सुद्धा केस पांढरे होण्या मागचे कारण आहे

आजकाल जास्त मुली केसांना तेल लावत नाही. केसांना तेल लावणे म्हणजे खूपच कमीपणा मानला जातो. मात्र केसांना तेल लावणे अत्यंत गरजेचे आहे. रोज तेल लावले नाही तरी किमान आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लाऊन व्यवस्थित मसाज केल्याने केसांची मूळं मजबूत होतात. यामुळे केसांची वाढ तर चांगली होतेच पण केस लवकर पांढरे होत नाहीत. तेलाचा वापर न केल्यास, कमी वयात केस पांढरे होऊ लागतात. कारण केसांना योग्य पोषण मिळत नाही. 

ADVERTISEMENT

शँपूचा जास्त वापर (Excess Use Of Shampoo) केस पांढरे करण्यास कारणीभूत आहे

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे

बरेचदा तुम्ही केमिकलयुक्त शँपूचा वापर केस धुण्यसााठी अधिक प्रमाणात करता. अर्थात हे नकळत घडत असते. याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर पडतो आणि केस लवकर पांढरे होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही शँपू घेताना त्यामधील उत्पादनांचा आढावा घेऊनच वापरा. केस पांढरे होण्यासाठी हेदेखील महत्त्वाचे एक कारण आहे. तर काही जणांना आठवड्यातून जास्त वेळा शँपूचा वापर करून केसांवरून आंघोळ करण्याचीही सवय असते. असे अजिबात करू नका.   

केस पांढरे न होण्यासाठी उपाय – Kes Pandhre N Honyasathi Upay

केस पांढरे न होण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. पण त्यासाठी एकदम महागड्या उपायांपेक्षा आधी घरगुती उपायांकडे लक्ष द्यायला हवे. केस पांढरे न होण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत जाणून घ्या. 

  • केस पांढरे होण्याची कारणे आपण पाहिली, केस पांढरे न होण्यासाठी उपाय म्हणून केसांना जास्वंद तेल, बदाम तेल आणि नारळाचे तेल अर्थात खोबरेल तेल एकत्र मिक्स करून लावा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे मिक्स करण्यात आलेले तेल तुम्ही आठ दिवसातून साधारण 3-4 वेळा लावा. हे तेल केसांना लावण्यापूर्वी कोमट करून घ्या. त्यानंतर केसांना लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. यामुळे केस पांढरे होत नाहीत आणि याशिवाय केसगळतीची समस्या असल्यास, तीदेखील थांबते
  • केस पांढरे न होण्यासाठी उपाय करत असल्यास, आल्याचा किस करून घ्या आणि हा किस दुधामध्ये मिक्स रून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही डोक्याला लावा आणि साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर केस व्यवस्थित धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा
  • नारळाच्या तेलामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस आणि कडिपत्त्याची पाने कुटून मिक्स करून घ्या. हे मिश्रण कडिपत्त्याची पाने काळी होईपर्यंत गॅसवर गरम करा. आंघोळ करण्याच्या साधारण 10 मिनिट्स आधी या तेलाने केसांना हलक्या हाताने मालिश करा. केस पांढरे न होण्यासाठी याचा फायदा होतो. आठवड्यातून साधारण दोन वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता. या मिश्रणाने केसांची ताकद वाढून केसांना आवश्यक ते पोषण मिळते 
  • कांद्याच्या रसाचा वापर करा. कांद्यामध्ये असणारे सल्फर हे केसांसाठी उपयुक्त ठरते. साधारण 2-3 कांदे कापून त्याचा रस काढा आणि तो रस केसांना लावा. यामुळे केस लवकर पांढरे होणार नाहीत. हा उपाय नियमित करा 
  • केस पांढरे न होण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही चहापावडरचा वापर करा. चहा पावडर पाण्यात व्यवस्थित उकळून घ्या आणि या पाण्याने केस धुवा. याचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसून येईल आणि केसही काळे होतील
  • आवळ्याचे लहान लहान तुकडे करा आणि तेलामध्ये उकळून घ्या. आवळ्याचा रंग काळा होईपर्यंत हे तेल उकळा आणि नंतर गाळून घ्या. तेल थंड झाल्यावर या तेलाने केसांना तुम्ही मालिश करा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग आंघोळ करा. आवळ्याच्या वापरामुळे केस पांढरे होत नाहीत आणि याशिवाय या तेलामध्ये लिंबाचे काही थेंब घातल्यास, त्याचाही केसांना फायदा मिळतो 
  • कोरफडचे फायदे अनेक आहेत. त्वचेसह केसांसाठीही कोरफड उपयुक्त ठरते. केस धुण्यापूर्वी तुम्ही केसांना ताजी कोरफड जेल लावा आणि मसाज करा. काही वेळाने केस धुवा. यामुळे केस काळे आणि घनदाट होण्यास मदत मिळेल

प्रश्नोत्तरे (FAQs) – केस पांढरे होण्याची कारणे | Reason For Greying Hair In Marathi

प्रश्न 1 – वयाच्या 20 व्या वर्षात केस पांढरे होतात का?
उत्तर – हो अनुवंशिकता असेल तर कितीही कमी वयात केस पांढरे होऊ शकतात. तसंच तुमच्या राहण्याची आणि आहाराची कशी पद्धत आहे त्यानुसारही तुमचे केस पांढरे कोणत्याही वयामध्ये होऊ शकतात हे लक्षात घ्या. 

प्रश्न 2 – मेलानिन कसे वाढवावे?
उत्तर – केस पांढरे होण्यास मेलानिन कारणीभूत ठरते. हे वाढविण्यासाठी तुम्ही विटामिन ए, बी आणि बी12 चा आहारात समावेश करा. अर्थात संत्री, द्राक्षे, अननस, टरबूज यासारखी फळे खा. तर बटाटा, गाजर, फरसबी या भाज्यांचा आहारात समावेश करून घ्या. मांसाहार करत असल्यास, लाल मांस, चिकन लिव्हर, मासे आणि अंडी खा.

ADVERTISEMENT

प्रश्न 3 – पांढरा केस दिसल्यावर ओढून काढणे योग्य आहे का?
उत्तर – असे करणे अजिबात योग्य नाही. असा केस ओढून काढल्यास, इतर केसांना आणि केसांच्या मुळांनाही त्रास होतो. याशिवाय इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे असे करू नये.

22 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT