ADVERTISEMENT
home / Skin Care Products
या कारणांसाठी वापरू नये जुनं आणि एक्सपायर्ड झालेलं मॉईस्चराईझर

या कारणांसाठी वापरू नये जुनं आणि एक्सपायर्ड झालेलं मॉईस्चराईझर

बाजारात विविध प्रकारची स्किन केअर प्रॉडक्ट मिळतात, मात्र त्यातून तुम्ही फक्त तुमच्या आवडीचेच काही प्रॉडक्ट खरेदी करता. एखादं ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या खूपच आवडीचे असते, ज्यामुळे ते टाकून देणं तुमच्या जीवावर येतं. मात्र असं जुनं आणि एक्सपायर्ड झालेले प्रॉडक्ट वापरणं धोकादायक असू शकतं. जरी तुम्ही एखादं प्रॉडक्ट एकदा अथवा दोनदाच वापरलं असेल मात्र ते खरेदी करून एक ते दोन वर्ष पूर्ण झाली असतील तर ते खराब होतंच. कारण प्रॉडक्टमध्ये एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त काळानंतर बदल होतात. प्रत्येक प्रॉडक्टचा रंग, सुगंध, टेक्चर आणि परिणाम यामध्ये बदल होत राहतात. असं जुनं झालेलं अथवा एक्सपायर्ड मॉईस्चराईझर तुमच्या वापरात असेल तर ते लगेच थांबवा कारण त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

Shutterstock

जुने आणि खराब झालेलं मॉईस्चराझर न वापरण्याची कारणे –

विश्वास ठेवा, जुनं आणि खराब झालेलं कोणतंही प्रॉडक्ट वापरणं त्वरीत थांबवणं तुमच्या फायद्याचंच ठरेल. जाणून घ्या यामागचं कारण.

ADVERTISEMENT

Shutterstock

अशा प्रॉडक्टमध्ये बॅक्टेरिआ असू शकतात –

जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट वापरण्यासाठी सुरु करता तेव्हा त्याचं सील ओपन केल्याबरोबरच त्याला बॅक्टेरिआ अथवा जीवजंतूंचा संपर्क होतो. शिवाय मॉईस्चराझर लावण्यासाठी तुम्ही सतत तुमचा हात त्याला लावत असता. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकवेळी मॉईस्चराईझर वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा अथवा सॅनिटाईझ करून घ्या. शिवाय मॉईस्चराईझरची डबी, बॉटल अथवा डबा बराच काळ उघडा राहणार नाही याची काळजी घ्या. कारण जर त्यामध्ये धुळ, माती, प्रदूषण गेलं तर ते खराब होऊ शकतं. ओलसरपणामुळे अशा क्रिमवर जीवजंतूंचे चांगले पोषण होते  आणि अशाप्रकारे तुमच्या त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण होतो.

कोणतेही सौंदर्य उत्पादन किंवा बॉडी मॉइश्चरायझर वापरण्यापूर्वी मायग्लॅमच्या वाइपआउट उत्पादनासह आपले हात स्वच्छ करा.

ADVERTISEMENT
 

हळू हळू मॉईस्चराईझरचा परिणाम कमी होतो –

खूप दिवस राहिल्यामुळे तुमच्या मॉईस्चराईझरचा परिणाम कमी होतो. मॉईस्चराईझर तुमच्या त्वचेला पोषण देण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी गरजेचे असतात. मात्र खूप दिवस राहिल्यामुळे त्यांची सक्रियता कमी होतो. ज्यामुळे त्यांचा त्वचेवर काहीच परिणाम होत नाही. यासाठी काही ठराविक काळानंतर जुने मॉईस्चराईझरचा वापर करणे बंद करा आणि ते बदलून दुसरे नवीन मॉईस्चराईझर वापरा.

 

कालांतराने मॉईस्चराईझरमधील पोषक घटक नष्ट होतात –

जेव्हा तुम्ही एखादे प्रॉडक्ट ओपन करता तेव्हा त्यातील पोषक घटक हळू हळू कमी होऊ लागतात. मॉईस्चराईझरमधील  ग्लायकोनिक, व्हिटॅमिन सी अशा अनेक पोषक घटकांचा वापर करण्यात आलेला असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. मात्र हळू हळू हे घटक त्या प्रॉडक्टमधून कमी कमी होऊ लागतात. जर तुम्ही मॉईस्चराईझर फ्रीज अथवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी ठेवले नाही तर ते लवकर खराब होतात. जर तुम्ही ते ओलसर, गरम अथवा आर्द्रता असलेल्या ठिकाणी ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठीच नेहमी ते फ्रीजमध्ये अथवा थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावेत. प्रत्येक मॉईस्चराईझर त्याची एक्सपायरी डेट दिलेली  असते. जर ती तारीख दिसत नसेल तर कोणतेही प्रॉडक्ट दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरू नये. जर चुकून तुम्ही तुमचं एक्सायर्ड झालेलं मॉईस्चराईझर वापरलं तर मुळीच काळजी करू नका. चेहरा स्वच्छ धुवून टाका आणि जुनं मॉईस्चराईझर फेकून द्या.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

मॉईस्चराईजर निवडताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

फेस सीरम आणि मॉईस्चराईझर यात काय आहे फरक (Facial Serum Vs Face Moisturizer)

फाऊंडेशन नको असेल तर ‘या’ प्रॉडक्टनेही मिळेल अप्रतिम लुक

27 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT