कोणतीही व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असते तेव्हा त्या व्यक्तीची जात, धर्म अथवा वयाचा विचार करत नाही. आपण निवडत असणारा जोडीदार हा आपल्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे याचा विचार सहसा केला जात नाही. वयामध्ये असणारे दोन – तीन वर्षांचे अंतर हे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण त्यापेक्षा अधिक अंतर असेल तर आपल्या कुटुंबाला ती गोष्ट स्वीकारायला बरेचदा वेळ लागतो. मात्र तरीही आजकाल आपण अशा अनेक व्यक्तींच्या जोड्या पाहतो ज्यांच्या वयामध्ये अनेक वर्षांचं अंतर आहे. प्रियांक चोप्रा – निक जोनास (Priyanka Chopra – Nick Jonas), मलायका अरोरा – अर्जुन कपूर (Malaika Arora – Arjun Kapoor), हृतिक रोशन – सबा आझाद (Hrithik Roshan – Saba Azad) अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. इतकंच नाही तर आपल्या आजूबाजूलादेखील अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. मग मात्र प्रश्न पडतो की, सध्या आपल्यापेक्षा अधिक वयाच्या मुलामुलीला डेट करणे अथवा लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे का? तर अर्थात हो. मग त्याची नक्की काय कारणे आहेत असाही प्रश्न उपस्थित होतो. तर त्यावर आम्हाला काय वाटते याबाबत आम्ही प्रकाश टाकला आहे. तुम्हाला हे पटतंय का नक्की पाहा.
आर्थिक स्वरूपात भक्कम असतात
बरेचदा आपल्यापेक्षा वयाने मोठा मुलगा अथवा मुलगी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असते. आजकाल महिलाही आत्मनिर्भर आहेत. अनेकदा मुलांपेक्षा अधिक कमावत्या असतात आणि आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करत असल्यास, त्याच्यावर पैसा खर्च करणे त्यांना कुठेही कमीपणाचे वाटत नाही अथवा आपली जोडीदार आपल्यापासून मोठी आहे आणि आपल्यापेक्षा जास्त कमवत आहे याचा न्यूनगंडही अनेक पुरूषांना आता येत नाही. तसंच पुरूषांच्या बाबतीतही आहे. महिला आत्मनिर्भर असतात पण तरीही आपल्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या पुरूषाला डेट करताना त्याच्याकडे पैशाची कमतरता नसते आणि आपले दोघांचेही भविष्य सुरक्षित आहे याची खात्री महिलांना वाटते. त्यामुळेच वयाचा विचार जास्त करण्यात येत नाही.
राग आणि त्रास कमी होतो
वयाने मोठ्या महिला वा पुरुषांसह प्रेमात असल्यानंतर त्यांना आयुष्याचा अधिक अनुभव असतो. त्यामुळे कोणतेही संकट आले अथवा कोणतीही कमतरता भासली की आपल्या आयुष्याचा अनुभव त्यांना कामी येतो आणि तुम्हालाही त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची साथ मिळते. त्याशिवाय आयुष्याचा अनुभव असल्यामुळे रागावरही योग्य नियंत्रण अशा व्यक्तींचे राहते. बरेचदा आपले वय लहान असेल तर अल्लडपणा कमी झालेला नसतो. मग अशावेळी आपल्याला समजून घेण्यास वयापेक्षा मोठे असल्याने अशा व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने नाते जपू शकतात. उगीचच त्रागा करून घेत नाहीत.
सेक्शुअल मॅच्युरिटी अधिक
प्रेमाच्या या नात्यात सेक्स (Sex) हा महत्त्वाचा भाग आहे. अनेक मनोवैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे अधिक वयाच्या मुलामुलीच्या प्रेमात पडण्याचे कारण म्हणजे सेक्शुअल मॅच्युरीटीदेखील असते. सेक्स करताना अधिक समजून घेतले जाते आणि Sexual Intimacy मधील बारीक बारीक गोष्टी समजून घेतल्या जातात. नात्यात शारीरिक गरजा पूर्ण होणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि वयाने मोठ्या महिला अथवा पुरूष ही गरज अत्यंत योग्य पद्धतीने पूर्ण करतात. त्यामुळेच वयात बरंच अंतर असेल तर नातं टिकायलाही मदत मिळते.
जास्त काळजी घेतात
प्रत्येकाला आपली काळजी करणारं कोणीतरी असावं असं नेहमीच वाटतं. अधिक प्रेम आणि काळजी कोणाला नको असते? अनुभवी महिला वा पुरूष आपल्या जोडीदाराची काळजी करण्यात अधिक चांगले असतात. नात्याला सहजतेने त्यांना जपता येते आणि आपल्या जोडीदाराला नेहमी स्पेशल वागणूक देण्यात या व्यक्ती पुढे असतात. तसंच आपल्या जोडीदाराला मानसिक पाठिंबा देण्यातही या व्यक्ती मागे राहात नाहीत.
त्यामुळेच अधिक वयाच्या मुलामुलीला डेट करण्याचं प्रमाण सध्या वाढल्याचं दिसून येत आहे. याशिवाय अधिक चांगल्या पद्धतीने नाते जपण्यास मदत मिळते असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक