Advertisement

पालकत्व

का रडते तान्हे बाळ, शांत करण्यासाठी जाणून घ्या कारण

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 28, 2021
का रडते तान्हे बाळ, शांत करण्यासाठी जाणून घ्या कारण

घरात बाळाचे आगमन म्हणजे घरातत अगदी आनंदी आनंद असतो. बाळाच्या संगोपनात सारं कुटुंब गुंग होतं. मात्र लहान बाळाचे संगोपन ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. बाळ लहान असल्यामुळे ते कोणाशी संवाद साधू शकत नाही. अशा वेळी व्यक्त होण्याचे त्याच्याकडे असलेले एकमेव साधन म्हणजे रडणे. बाळाच्या रडण्यातून ते अनेक गोष्टी तुम्हाला सांगत असते. मात्र यासाठी बाळ का रडू शकते याची कारणे तुम्हाला माहीत असायला हवी. जर तुमच्या घरी तान्हे बाळ असेल तर जाणून घ्या बाळ रडण्यामागची ही काही कारणे 

बाळ या कारणांमुळे रडण्याची आहे शक्यता

घरात बाळ हसता हसता अचानक रडू लागलं तर त्याच्या रडण्यामागचं  कारण  ओळखा आणि त्या पद्धतीने त्याला शांत करा.

भूक लागणे –

बाळ रडण्यामागचं महत्त्वाचं  कारण बाळाला भूक लागणे हे असू शकतं. बाळ मोठ्या माणसांसारखे अन्नपदार्थ खात नाही. त्यामुळे त्याला आपल्या वेळेनुसार भूक लागत नाही. आईचे दूध पचवण्यासाठी त्याला ठराविक वेळ लागतो आणि ते पचल्यावर पुन्हा भूक लागते. साधारणपणे बाळाला सुरुवातीच्या काळात दर दोन तासानंतर दूध देण्याचा  सल्ला दिला जातो. कारण बाळाची दूध पिण्याची क्षमता आणि पचवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे जर तुमचे बाळ अचानक रडायला लागले तर त्याला भूक लागली असेल हे ओळखा. जाणून घ्या 6 महिन्याच्या बाळाचा आहार (6 Months Baby Food In Marathi)

पोट दुखणे –

बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत बाळ फक्त आईच्या  दूधावर असते. ज्यामुळे आई जे खाणार त्याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होणार. जर या काळात आईने चुकीचे पदार्थ खाल्ले तर बाळाला गॅस आणि अपचन होण्याची शक्यता असते. अशावेळी बाळ पोटात दुखू लागल्यामुळे रडू लागते. हा संकेत आई फक्त तिने दिवसभरात काय खाल्ले यावरून समजू शकते. यासाठी बाळ अस्वस्थ असेल तर बाळाच्या डॉक्टरांचा आणि घरातील थोरामोठ्यांचा सल्ला घ्या. 

Baby

अपुरी झोप –

बाळाची झोप पूर्ण झाली की ते आनंदी दिसते. मात्र नवीन बाळ घरी येण्याच्या आनंदात सतत बाळाला उचलून घेणे, अनोळखी माणसे घरात भेटायला येणे, अशांतता अशा गोष्टींमुळे बाळाची झोप पूर्ण होत नाही. बाळ जितके शांत झोपेल तितके ते चांगले खेळते. मात्र झोप अपूरी झाली की ते चिडचिड करून रडू लागते. यासाठी बाळ रडू लागल्यास त्याला शांत झोपवा. तसेच समजून घ्या उशीरा का बोलू लागतात मुलं, उच्चार शिकवण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर

पोट भरलेले नसल्यास –

बाळाचे पोट भरले याचा संकेत त्याने ढेकर दिल्यानंतर येतो. कारण तो तोंडाने काही बोलू शकत नाही. यासाठी दूध पाजल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढण्याची पद्धत आहे. बाळ सतत झोपून असल्यामुळे प्यायलेले दूध व्यवस्थित पचण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. मात्र हे करण्यासाठी तज्ञ्जांची मदत घ्यावी कारण चुकीच्या पद्धतीने बाळाला उचलले तर उलटी आल्याने प्यायलेले दूध बाहेर पडू शकते. ढेकर न दिल्यास बाळाला अस्वस्थ वाटते आणि ते रडू लागते.

यासाठीच बाळ रडण्यामागची  कारणे ओळखा आणि योग्य तो उपाय करून बाळ शांत करा. यासोबतच जाणून घ्या च आणि छ वरून मुलामुलींची नावे, नवीन आणि अर्थासह (Baby Names Starting with Ch and Cha)