स्किन केअर रुटिन करताना चेहऱ्याप्रमाणे हात आणि पायांची निगा राखणं तितकंच गरजेचं आहे. पायाची काळजी घेण्यासाठी महिन्यातून एकदा पेडिक्युअर पुरेसं आहे असं अनेकांना वाटतं. मात्र असं नाही तुम्ही दररोज अथवा दोन तीन दिवसांनी पाय डिटॉक्स करू शकता. कारण घामामुळे पायाच्या तळव्यांना वास येत असतो, पाय कोरडे पडल्यामुळे टाचा फुटतात, चालण्यामुळे पायाच्या तळव्यांना सतत धुळ, माती चिकटत असते. यासाठी नियमित पायाची निगा राखणं गरजेचं आहे. यासाठी घरच्या घरी फॉलो करा या टिप्स
मीठ आणि बेकिंग सोडा
पायाच्या तळव्यांवर सर्वात जास्त धुळ, माती बसत असते. ज्यामुळे पाय लवकर खराब होतात. शिवाय पायाच्या टाचांवर डेड स्किनही लवकर निर्माण होते. यासाठी या पाण्याने स्वच्छ करा तुमचे पाय
कसे कराल तयार –
- एका भांड्यांत गरम पाणी तयार करा
- त्यामध्ये एक ते दोन कप एप्सम सॉल्ट आणि थोडा बेकिंग सोडा टाका
- या पाण्यात पाय अर्धा तास बुडवून ठेवा
- ब्रशने पाय स्वच्छ करा आणि रिलॅक्स व्हा
थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल (Best Foot Scrubs In India)
लव्हेंडर ऑईल
आजकाल लव्हेंडर स्क्रबचे मेनिक्युअर खूपच लोकप्रिय होत आहे. तुम्ही देखील घरच्या घरी लव्हेंडर ऑईलचे फुट सोक तयार करू शकता.
कसे कराल तयार –
- एका भांड्यात पाणी गरम करा
- त्यात एप्सम सॉल्ट, मध आणि चार ते पाच थेंब लव्हेंडर ऑईल मिसळा.
- या मिश्रणात तुमचे पाय अर्धा तास बुडवून ठेवा आणि स्वच्छ करा.
पायाची काळजी कशी घ्यावी (How To Take Care Of Your Feet)
चंदन ऑईल
पायाच्या तळव्यांना सतत घाणेरडा वास येत असेल तर हे फुट सोक तुमच्यासाठी खूपच परफेक्ट ठरेल. ज्यामुळे पायाला सुगंध मिळेलच शिवाय चंदनामुळे तुमच्या पायातील स्नायू रिलॅक्स देखील होतील.
कसे कराल तयार –
- एका भांड्यात पाणी गरम करा
- त्यामध्ये बदाम आणि चंदनाच्या तेलाचे काही थेंब टाका
- या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून ठेवा
पुदिना तेल
पायाला थंडावा देण्यासाठी आणि पायाला छान सुगंध येण्यासाठी तुम्ही पुदिना तेल वापरून फुट सोक तयार करू शकता.
कसे कराल तयार –
- एका भांड्यात थोडे गरम पाणी घ्या
- त्यामध्ये लेमन ग्रास ऑईल आणि पुदिना तेलाचे काही थेंब टाका
- थोडं मीठ मिसळा आणि पाय त्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेवा आणि नंतर स्वच्छ करा
- या फुटसोकमुळे तुमच्या पायांना आणि संपूर्ण शरीराला फ्रेश वाटेल
कापूर आणि निलगिरी तेल
बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात असलेलं कापूर आणि निलगिरी तेल वापरू शकता. ज्यामुळे पाय निर्जंतूक होतील आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल
कसे कराल तयार –
- एका भांड्यात गरम पाणी घ्या त्यामध्ये थोडं मध, कापराचे तेल, बदामाचे तेल, निलगिरी तेल आणि मीठ टाका
- या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून ठेवा ज्यामुळे तुमचा थकवा नक्कीच दूर होईल
मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)