ADVERTISEMENT
home / Fitness
back pain

जास्त वेळ प्रवास किंवा ड्रायव्हिंग केल्याने होणाऱ्या पाठदुखीसाठी हे उपाय करा

कामासाठी दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसणे  कमी-फ्रिक्वेंसीचे व्हायब्रेशन्स आणि ड्रायव्हिंग करताना एकाच पोझिशनमध्ये बसावे लागल्याने पाठदुखी होऊ शकते. खाली, मध्यभागी किंवा वरच्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त असताना गाडी चालवणे कठीण होऊन बसते. तुम्हाला दररोज ऑफिसला जाण्यासाठी गाडी चालवावी लागत असेल किंवा कधी लांबचा प्रवास करताना दीर्घ कालावधीसाठी ड्रायव्हिंग करावे लागणार असेल तर पाठदुखी होऊ शकते. जर गाडी चालवताना पाठदुखी व मानदुखी वारंवार होत असेल आणि गाडी चालवणे कठीण होत असेल आपल्याला टेन्शन येते की आपण यापुढे गाडी चालवू शकणार नाही. 

गाडी चालवताना होणारी पाठदुखी टाळण्यासाठी टिप्स

पोस्चर व सीट अरेंजमेंट – ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर कुबड काढून किंवा फार रेलून बसू नका. कारण यामुळे पाठीच्या कण्याचा आकार बदलतो.  संपूर्ण पाठ तुमच्या सीटच्या मागील बाजूस टेकेल अशा प्रकारची सीट अरेंजमेंट ठेवा.  सीट अशा प्रकारे  ऍडजेस्ट करा की तुम्ही सीटला आरामात पाठ टेकून स्टिअरिंग हॅन्डल करू शकता.   तसेच सीट अशा प्रकारे असली पाहिजे  की तुम्हाला रस्ता सहजपणे दिसू शकेल. गाडी चालवताना पाठीचा कणा आणि खांदे सरळ असले पाहिजेत. वाकून, कुबड काढून आणि खांदे झुकलेले या पोझिशनमध्ये बसल्याने पाठदुखी होते. स्टिअरिंग व्हील तुमच्या दिशेने ऍडजेस्ट करा जेणेकरून तुम्हाला हात जास्त ताणून पुढे जाण्याची गरज नाही. यामुळे हात आणि मानेवर कमी ताण पडेल. तसेच हेड रेस्ट आपल्या डोक्याच्या वर किंवा कमीतकमी डोळ्यांच्या लेव्हलवर असावे. तसेच मिरर अशा प्रकारे ऍडजेस्ट करा की सरळ बसून आपल्याला सगळे व्यवस्थित दिसू शकेल. अशा आरामदायक पोझिशनमध्ये गाडी चालवा जेणेकरून पाठ, मान, खांदे व हात यांवर ताण येणार नाही. 

मान आणि खांद्याचा व्यायाम – प्रवास करत असताना ठिकठिकाणी लाल सिग्नल मिळाला की आपल्याला वैताग येतो. पण आपल्या प्रवासात येणाऱ्या या व्यत्ययाचा आपण फायदा करून घेऊ शकतो. जेव्हा आपण सिग्नलवर गाडी थांबवलेली असते तेव्हा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पिऊ शकता. तसेच बसल्या-बसल्या मानेचा व खांद्याचा व्यायाम करू शकता. व्यायामामुळे स्नायूंचे स्ट्रेचिंग होते व शरीर थोडे हलके वाटते. यामुळे गाडी चालवताना पाठदुखी टाळता येऊ शकते.

गाडीत योग्य प्रकारे बसणे – गाडीत बसताना आधी गाडीत पाय ठेवून मग बाकीचे शरीर आत घेऊन बसण्याऐवजी आधी बसून घेऊन मग पाय आत घेणे तसेच गाडीतून बाहेर पडताना आधी मान बाहेर काढण्याऐवजी आधी पाय बाहेर काढून मग सावकाश उतरल्याने पाठीवर ताण येत नाही. तसेच गाडीत बसताना तुमच्या मागच्या खिशात किंवा बाजूच्या खिशात काहीही ठेवू नका. याने पाठीच्या कण्याचा आकार बिघडतो. तसेच बसताना दोन्ही पायांवर सारखेच वजन ठेवून बसा. सर्व वजन फक्त एकाच पायावर ठेवून बसू नका.

ADVERTISEMENT

स्ट्रेचिंगचे व्यायाम – डेस्कवर आणि कारमध्ये जास्त वेळ बसल्याने स्नायू कडक होतात. म्हणूनच जिथे शक्य असेल तिथे गाडी बाजूला पार्क करा आणि बाहेर पडा व थोडेसे स्ट्रेचिंग करा. कंबरेवर हात ठेवून किंवा हात पसरून पश्चिमोत्तनासन,  त्रिकोणासन किंवा त्रिकोण मुद्रा करा. यामुळे गाडी चालवताना होणारी पाठदुखी कमी होण्यास मदत होईल. तसेच रोजचा व्यायाम करताना उत्तानासन ,भुजंगासन , धनुरासन, उष्ट्रासन करा. ही आसने मणक्यासाठी चांगली आहेत.

लांबचा प्रवास असेल तर आईस पॅक किंवा कोल्ड पॅक सोबत ठेवा. कोल्ड प्रेसमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. गाडी चालताना होणारी कंपने आणि रस्ता खराब असल्यास बसणारे धक्के यामुळे मज्जातंतूवर ताण निर्माण होऊ शकतो ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते. शॉक ऍबजॉर्बर म्हणून कार सीट कुशन वापरा. तसेच टायरमधील हवा देखील योग्य प्रमाणात असायला हवी.

ही सर्व काळजी घेतल्यास पाठदुखी नक्कीच कमी होऊ शकेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT