ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
 Plastic Replacement Products

पर्यावरणाच्या रक्षणात उचला आपला वाटा, प्लास्टिक सोडून या गोष्टींकडे वळा 

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्लास्टिक वापरतो. आपल्या दिवसाची सुरुवात प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केलेल्या दुधापासून होते. मोठी माणसे ऑफिसमध्ये तर लहान मुले शाळेत प्लास्टिकच्या टिफिनमध्ये जेवण घेऊन जातात. प्लास्टिक केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. प्लास्टिकमुळे होणारे नुकसान पाहता आपणही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी उचलली पाहिजे व प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. 

कागद

Plastic Replacement Products
Plastic Replacement Products

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक वस्तू साध्या कागदात बांधून दिल्या जात होत्या. जी पर्यावरणपूरक सवय होती. पण नंतर कागदाची जागा प्लास्टिकने घेतली. पण आता लोक पुन्हा पेपर बॅग्स आणि पॅकिंगसाठी कागद वापरू लागले आहेत. परंतु कागद पुन्हा पुन्हा पुन्हा वापरला जाऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेळी तो पुन्हा वापरला जातो तेव्हा त्याचे तंतू कमी होतात, त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित प्रमाणात केला पाहिजे. कागद हा विघटनशील असल्याने तो वापरण्यास सुरक्षित आहे. फक्त चमकदार दिसणारा कागद वापरू नये. 

स्टेनलेस स्टील

Plastic Replacement Products
Plastic Replacement Products

दररोज वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या प्रदूषणात खूप भर घालत आहेत. त्याऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरणे आरोग्यदायी आहे. स्टेनलेस स्टील मजबूत  असते आणि ते स्वच्छ करणे देखील सोपे आहे. त्यामुळे प्लास्टिक ऐवजी स्टीलचे डबे व पाण्याची बाटली वापरणे पर्यावरणासाठी व आरोग्याच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे. अलीकडच्या काळात अनेक लोक प्लास्टिक सोडून स्टीलकडे वळू लागले आहेत. 

काच

Plastic Replacement Products
Plastic Replacement Products

बायोडिग्रेडेबल नसली तरी, काच स्वस्त असते आणि तिचा सहज पुनर्वापर करता येतो. अन्न साठवण्यासाठी प्लास्टिक ऐवजी काचेची भांडी वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. जाम, मध, लोणचे, ड्रायफ्रूट्स आणि बरेच काही काचेच्या बरणीत साठवले जाऊ शकते.काचेच्या वस्तूंची काळजी घ्यावी लागते. पण काच रिसायकल करता येते. त्यामुळे प्लास्टिक ऐवजी काचेच्या वस्तू वापरणे कधीही चांगले.   

ADVERTISEMENT

लाकूड 

Plastic Replacement Products
Plastic Replacement Products

लाकूड देखील प्लास्टिक ऐवजी वापरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. टूथब्रश, स्वयंपाकघरातील भांडी आणि कटिंग बोर्ड यासारख्या घरगुती वस्तूंमध्ये लाकूड प्लास्टिकची जागा घेऊ शकते.

नैसर्गिक फायबर फॅब्रिक

प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी आपण कापडी पिशव्या वापरायला हव्या.  सेंद्रिय कापूस, लोकर, ताग किंवा बांबूपासून बनवलेले टिकाऊ कापड धुतल्यावर प्लास्टिकप्रमाणे मागे मायक्रोफायबर सोडत नाही. खरेदीसाठी प्लास्टिकऐवजी लोकर, ज्यूट किंवा कापसाच्या पिशव्या वापरणे पर्यावरणपूरक आहे. 

बांबू

बांबू हे जलद गतीने वाढणारे पर्यावरणपूरक संसाधन आहे.प्लास्टिकऐवजी बांबूपासून बनवलेल्या  टेबलवेअर आणि ड्रिंकिंग स्ट्रॉ यासारख्या वस्तू वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. हे हलके, टिकाऊ आणि कंपोस्टेबल आहे.

बायोप्लास्टिक – एक उत्तम पर्याय 

Plastic Replacement Products
Plastic Replacement Products

बायोप्लास्टिक्स किंवा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हे कंपोस्टेबल प्लास्टिक आहे जे पेट्रोलियम ऐवजी नैसर्गिक पदार्थांपासून बनवले जाते.त्यामुळे ही एक अभिनव कल्पना आहे. ते इको फ्रेंडली देखील आहे. परंतु त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी व्यावसायिक सुविधा आवश्यक आहेत. परंतु तरीही आपण ते दैनंदिन गरजांसाठी वापरू शकता.

ADVERTISEMENT

नैसर्गिक पॅकेजिंगसाठी इको-फ्रेंडली पर्याय

सध्या जगभरातील अनेक कंपन्या पूर्णपणे कंपोस्टेबल पॅकेजिंगवर काम करत आहेत. शेतीतील कचरा आणि मायसेलियम (मशरूम रूट) यांच्या मिश्रणातून होम कंपोस्ट तयार केले जाते. स्टायरोफोम पॅकेजिंगच्या जागी मशरूम पॅकेजिंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते. स्टायरोफोम पॅकेजिंग देखील प्लास्टिकप्रमाणेच प्रदूषण करते. अशा पॅकेजिंगवर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. तसेच थायलंडमध्ये एका सुपरमार्केटने केळीचे पान आणि बांबू पॅकेजिंगला प्रोत्साहन देत प्लास्टिकमुक्त पॅकेजिंगची निवड केली आहे. केळीची पाने ही पर्यावरणासाठी १००% इको फ्रेंडली पर्याय आहेत.

त्यामुळे आपणही प्लास्टिक ऐवजी इको फ्रेंडली पर्यायांचा विचार केला पाहिजे. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT