ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ह्रतिक आणि सबा

या मिस्ट्री गर्लसोबत ह्रतिक आहे रिलेशनशीपमध्येच, फोटो वायरल

 ह्रतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून कोणाला तरी डेट करतोय अशा नुसत्या चर्चा होत होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण जी मिस्ट्री गर्ल या नावाने प्रसिद्ध होती तीच ह्रतिकची गर्लफ्रेंड असल्याचे समोर आले आहेत. आता त्या मुलीने देखील याचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमधून एका तरुणीचा हात पकडून ह्रतिक बाहेर येताना दिसला त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ही मिस्ट्री गर्ल आता मिस्ट्री राहिली नसून ती कोण आहे ते आता सगळ्यांनाच कळाले आहे.

मिस्ट्री गर्लचा झाला उलगडा

ह्रतिकसोबत जी मुलगी मास्क घालून हॉटेलच्या बाहेर पडत होती. ती सबा आझाद असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्या व्हिडिओमध्ये जरी तिने मास्क घातला असला तरी अनेकांनी तिला ओळखले आहे. सबा आझाद ही एक गायिका असून ती अनेक ठिकाणी रॉक परफॉर्मन्स देत असते. ती अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक इंग्लिश प्लेमध्ये काम केलेले आहे. आता रिपोर्टस आणि मिळालेल्या माहितीनुसार ही मिस्ट्री गर्ल कोण आहे ते आधीही लोकांना माहीत होते. कारण काहीच दिवसांपूर्वी सुझेन खानने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये सबा आझाद दिसली होती. त्यामुळे त्याच्यासोबत असलेली मुलगी ही सबा आझाद असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसली होती सबा

ह्रतिकची एक्स बायको सुझेन आणि ह्रतिक अनेकदा एकत्र असतात. त्यामुळे ही दोघं पुन्हा एकत्र येण्याची चर्चा होती. पण असे काहीच झाले नाही. ही दोघे आपल्या नात्यात मूव ऑन झाली आहेत. सुझेनदेखील डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतरच सुझेन आणि ह्रतिकच्या नात्याचा खुलासा झाला होता. पण आता आणखी काही गोष्टींमुळे ही नात्याचा उलगडा झाला आहे. हाच फोटो आणि व्हिडिओ आल्यानंतर अनेकांनी ह्रतिक आणि सुझेनला ट्रोल केले होते. दोघे आपआपल्या जोडीदारासोबत असे फोटो काढतात. त्यामुळे यांच्या मुलांवर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न देखील अनेकांनी त्यांना केला होता. पण त्याचा फारसा फरक त्यांना पडणार नाही. कारण त्यांनी आधीच त्यांच्या नात्याचा निर्णय घेतलेला असावा. 

नव्या प्रोजेक्टची उत्सुकता

रिलेशनशीपची चर्चा जरी जोरदार होत असली तरी देखील ह्रतिकच्या चित्रपटाची अनेकांना प्रतिक्षा असते. तो कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसेल आणि कोणत्या भूमिकेत याची वाट सगळेच पाहात आहेत. 48 वर्षांचा ह्रतिक आजही अनेक तरुणींच्या गळ्यातले ताईत आहे. निवडक चित्रपट आणि अंदाज यामुळे तो आशियातील सेक्सीएस्ट मॅनच्या यादीत देखील आहे. सध्या तो त्याच्या आगामी विक्रम वेधा या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. तो या संदर्भातील अनेक पोस्ट करत असतो. 

ADVERTISEMENT

तुम्हाला काय वाटते? ह्रतिक आणि सबा हे खरंच रिलेशनशीपमध्ये असतील का? 

26 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT