आज महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. याच शुभदिवसाचा मुहूर्त साधत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार याची चर्चा गेले कित्येक महिन्यांपासून होती पण सरतेशेवटी या वर्षीच्या शिवजयंतीला हा मुहूर्त सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांच्या गाथा प्रत्येक ठिकाणी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सांगितल्या जातात आणि त्या ऐकताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या या छत्रपती राजाची महागाथा रितेश देशमुख घेऊन येत आहे. ही घोषणा केल्यानंतर अनेकांनी रितेशचे अभिनंदन केले आहे.
‘स्वदेश’ मधील शाहरूखची आई कावेरी अम्माचे निधन
नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन
या चित्रपटाची घोषणा करताना स्क्रिप्टचे अॅनिमेशन पोस्ट करण्यात आले आहे. त्यावर दिग्दर्शक म्हणून ‘सैराट’ फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेचे नाव आहे. हा तर एक मणिकांचन योग जुळून आल्यासारखे फिलिंग सध्या चाहत्यांचे आहे आणि त्यावर मधुर कळस म्हणजे या चित्रपटाला संगीत देणार आहे अजय – अतुल ही जोडी. त्यामुळे रितेशने ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या दिवशी इतकी मोठी घोषणा म्हणजे महाराजांच्या मावळ्यांसाठी एक सुखाची बातमी आहे. शिवाजी महाराज हे अनेकांचे दैवत आहेत. मोठ्या पडद्यावर त्यांच्या महागाथा पाहायला मिळणे म्हणजे अगदी स्फूर्तीदायक असते. त्याशिवाय रितेश देशमुख हा चित्रपट घेऊन येत आहे त्यामुळे चाहत्यांना अधिक उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात नक्की कोण शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे सांगण्यात आलेले नसले तरीही रितेश देशमुखच ही भूमिका साकारणार असल्याचा कयास आता बांधला जात आहे.
मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार ‘बोनस’
रितेशने सोशल मीडियावर घोषणा करून मागितला आशिर्वाद
रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर करत, ‘अभिमानाने सादर करत आहोत…तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या…जय शिवराय’ असे म्हटले आहे. या एका पोस्टमुळेच सर्वांच्या अंगात एक सळसळता उत्साह आलेला दिसून येत आहे. अगदी कमी वेळामध्ये या पोस्टला लाखो लाईक्स मिळत आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनीही रितेशचे अभिनंदन केले आहे. आता या चित्रपटामध्ये नक्की कोण कोण असणार आणि कोणते सेलिब्रिटी असणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. आपण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत अशा आशयाची अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. तर रितेश, नागराज मंजुळे आणि अजय – अतुल ही तिगडी या चित्रपटामध्ये कमाल दाखवेल असा विश्वास चाहत्यांना आहे. तर रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये कसा दिसेल याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही रितेशने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र प्रदर्शनाची तारीख नक्की कोणती असेल याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल अशाही चर्चांना आता उधाण आले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता नक्कीच प्रेक्षक गर्दी करतील अशीही चर्चांना सुरूवात झाली आहे.
’83’: दीपिका पादुकोनचा फर्स्ट लुक रिलीज, चाहत्यांना आता प्रतीक्षा ट्रेलरची
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.