ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Film Review : वायरलेस असूनही प्रेमाची गुंतागुंत असलेला ‘ट्रिपलसीट’

Film Review : वायरलेस असूनही प्रेमाची गुंतागुंत असलेला ‘ट्रिपलसीट’

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. यंदा मराठी चित्रपटसृष्टीत दिवाळीचा महाधमाका करत ‘ट्रिपलसीट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची टॅगलाईनच आहे ‘ट्रिपलसीट – गोष्ट वायरलेस प्रेमाची’ मात्र ही प्रेमकथा वायरलेस असूनही भावनिक गुंतागुंतीची ठरते. प्रेम, प्रेमात निर्माण होणारा त्रिकोण, भावनांची गुंतागुंत असूनही मजेशीर, हलकीफुलकी आणि थोडीशी हटके अशी ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

ट्रिपलसीटः गोष्ट वायरलेस प्रेमाची

या चित्रपटाची कथा सुरू होते ती एका मुलाखतीच्या कार्यक्रमातून. जहांगीर इराणी (राकेश बेदी) या प्रसिद्ध वकीलाची मुलाखत सुरू असते. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनातील एखाद्या अविस्मरणीय केसविषयी विचारलं जातं. या केसच्या आठवणीतच ही वायरलेस प्रेमकथेला दडलेली आहे. कथेचा नायक कृष्णा सुर्वे ( अंकुश चौधरी) एक सर्वसामान्य घरातील तरूण आहे. त्याच्या घरी आईच्या मृत्यूनंतर खचलेले आणि दारूच्या अधीन गेलेले वडील, तरूण आणि लग्नाळू बहिण, गरोदरपणासाठी माहेरी आलेली चुलत बहिण आणि तिचा नवरा असे कुटुंबिय असतात. कृष्णाची स्वतःच्या मालकीची  एक व्हॅन असते. जी चालवत, सतत इतरांना मदत करत तो त्याचं आयुष्य मजेत घालवत असतो. दिलेला शब्द आणि वेळ तो कधीच चुकवत नाही ही त्याची ख्याती असते. अशातच त्याला एक मिस कॉल येतो. एक तरूणी त्याला तिला वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्याच्याकडे मदत मागते. शिवाय तिच्याजवळील फोनमधील बॅलेन्स संपलेला असल्यामुळे त्याला फोनमधील बॅलेन्स रिचार्ज करण्यासाठी सांगते. त्या मिसकॉलमुळे घाबरून गेलेला कृष्णा तिच्या फोनचा बॅलेन्स रिचार्ज करतो आणि ही गोष्ट पोलिसांना कळवतो. मात्र त्या तरूणीने कॉलेजमधील एक चॅलेंज स्विकारून त्याला हा मिसकॉल केलेला असतो. ज्याबद्दल ती त्याची माफी मागते आणि तिचं नाव मीरा आहे असं सांगते. वास्तविक तिचं खरं नाव तन्वी प्रधान (शिवानी सुर्वे) असतं. या मिसकॉल प्रकरणातून पुढे त्यांची फोनवर मैत्री होते आणि दोघं तासन तास एकमेकांशी गप्पा मारतात. कृष्णाच्या बहिणीच्या लग्नासाठी स्थळ येतं आणि मुलगी पसंत झाल्यावर साटंलोटं पद्धतीने लग्न ठरतं. ज्यामध्ये कृष्णाचं लग्न वराच्या बहिणीशी म्हणजेच वृंदा (पल्लवी पाटील) शी ठरतं. कृष्णाला वृंदा आवडते ज्यामुळे तो या लग्नासाठी पटकन  तयार होतो. तो तन्वीला त्याच्या साखरपुड्यासाठी बोलावतो मात्र तन्वी येण्यास नकार देते. तन्वी कृष्णाशी बोलत असताना तिचे वडील वसंतराव प्रधान ( वैभव मांगले) ते ऐकतात आणि तन्वीला मारहाण करतात. वसंतरावांचं त्यांच्या मुलीवर प्रेम नसतं कारण त्या मुलगा हवा असतो. ज्यामुळे ते तन्वीसोबत विचित्रपणे वागत असतात. तन्वी घर सोडून जाते आणि पोलिस यासाठी कृष्णाला त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीच अटक करतात. हा गुंता सोडवण्यासाठी तन्वी पोलिस स्टेशनमध्ये येते आणि घाबरून कृष्णाचं आणि तिचं एकमेकांवप प्रेम असल्याची कबुली देते. ज्यामुळे पोलिस जबरदस्ती करून कृष्णा आणि तन्वीचं लग्न लावतात. ज्यामुळे कृष्णाच्या बहिणीचं लग्न मोडतं आणि वृंदा दुःखी होते. कृष्णा वृंदाच्या घरच्यांना समजावून सहा महिन्यांनी तन्वीला घटस्फोट देऊन वृंदाशी लग्न करण्याचा शब्द देतो. या सहा महिन्यात अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे तन्वी कृष्णा आणि त्याच्या कुटुंबियांचं मन जिंकते. मात्र दिलेला शब्द पाळणारा कृष्णा पुढे काय करतो हे फार महत्त्वाचं ठरतं. तो तन्वीला घटस्फोट देऊन वृंदाशी लग्न करतो की तन्वीला घटस्फोट देत नाही हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. कारण प्रेम महत्त्वाचं की दिलेला शब्द याचं कोडं चित्रपटाच्या शेवटी समजतं. हा प्रेमाचा गुंता कसा सुटतो हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की पाहा. 

ADVERTISEMENT

चित्रपटाच्या जमेच्या बाजू –

चित्रपटाची कथा इतर प्रेमकथांपेक्षा हटके आहे. अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील या तिन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे. अंकुश चौधरीला कृष्णाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच आतूर असतील यात शंका नाही. मात्र शिवानी आणि पल्लवी यांनीदेखील त्यांच्या भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत. प्रविण तरडे यांनी रंगवलेला पोलिस अधिकारी प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 

चित्रपटाच्या उणिवा –

चित्रपटाची कथा बराच काळ मिस कॉल भोवतीच रेंगाळत राहते. दिग्गज कलाकारांची भट्टी अचूक जमूनही कथा लांबल्यामुळे चित्रपट पाहणं कंटाळवाणं वाटू लागतं. प्रेमाची गुंतागुंत पाहताना चित्रपट कुठे वळण घेणार हे प्रेक्षकांना आधीच लक्षात येऊ शकतं. 

निर्माते – नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया , स्वप्नील  संजय मुनोत, अॅड. पुष्कर तांबोळी

दिग्दर्शक – अभिजित दळवी

ADVERTISEMENT

कथा – अभिजित दळवी

कलाकार – अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील

स्टार्स – 3.5

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

नेहा कक्कड पुन्हा चर्चेत, स्पर्धकाने खुलेआम केलं Kiss

SRK च्या फॅन्ससाठी दोन चांगल्या बातम्या

25 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT