ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अखेर एक महिन्यानंतर रियाने केली सुशांतसाठी भावनिक पोस्ट शेअर

अखेर एक महिन्यानंतर रियाने केली सुशांतसाठी भावनिक पोस्ट शेअर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही तो गेला आहे यावर कोणीही विश्वास ठेऊ शकत नाहीये. सुशांत गेल्यानंतर अनेक चर्चा झाल्या आणि अनेकांवर आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. खरं तर अजूनही सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते आग्रही आहेत. त्याचं खासगी आयुष्यही त्यामुळे चव्हाट्यावर आलं. मात्र अजूनही सुशांतच्या जाण्यानंतर रोज काही ना काहीतरी नव्या गोष्टी चालूच आहे. या सगळ्यात त्याच्या एक्स गर्लफ्रेंड आणि इतरांनाही खूपच त्रास झाला. पण या सगळ्या काळात सर्वात जास्त चर्चा झाली ती रिया चक्रवर्तीची. सुशांत गेल्यानंतर रियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तर सुशांतच्या जाण्यानंतर वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तिची पोलिसांनी कसून 11 तास चौकशी केली होती. आता मात्र अखेर एक महिन्यानंतर रियाच्या भावनांचा बांध फुटला असून रियाने सुशांतसाठी असणारं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. रिया गेले एक महिना सोशल मीडियापासून लांब होती. मात्र आता तिने भावनिक पोस्ट शेअर करत सुशांत तिच्यासाठी नक्की काय होता ते स्पष्ट केलं आहे. 

तब्बल एक महिन्यांनी अंकिता लोखंडेने पोस्ट केला फोटो

सुशांतवरील प्रेम केले व्यक्त

रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुशांतबरोबर असणारे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. रियाने  आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत लिहिले, ‘मी अजूनही माझ्या भावनांसह झगडत आहे. माझ्या मनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तू मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवलंस, प्रेमाची ताकद नक्की काय असते ते मला तू सांगितलं. साधे गणिताचे कोडं आयुष्याचा अर्थ कसा काय उलगडू शकतं हेदेखील शिकवलं आणि मी तुला वचन देते की मी रोज तुझ्याकडूनच हे शिकत राहणार आहे. तू इथे नाहीस असं मला एकही दिवस वाटलं नाही.

मला माहीत आता तू जिथे  आहेस तिथे खूपच निवांत जगत आहेस. हे आकाश, चंद्र – तारे हेच तुझ्यासाठी सर्व काही होतं आणि हे सगळेच एका महान भौतिकशास्त्रज्ञाने नक्कीच मोठ्या उत्साहात स्वागत करत असतील. मी माझ्या त्या शूटिंग स्टारची वाट पाहतेय, जो तुला माझ्याकडे परत आणण्याची माझी इच्छा पूर्ण करू शकेल.

ADVERTISEMENT

तुझ्यासारखा सुंदर माणूस आणि जगातील एक आश्चर्य होतास. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत आणि मला माहीत आहे की, तुला या सगळ्याचा अर्थ माहीत होता. आपण एकमेकांसाठी काय आहोत हे तूच मला सांगितलं होतंस.

तू अतिशय मोकळ्या मनाने सर्वांना आपलंसं केलंस आणि खरं प्रेम नक्की काय असतं ते मला दाखवलंस

तू शांततेच राहा सुशी. तुला गमावून 30 दिवस उलटून गेले आहेत. पण मी तुझ्यावर आयुष्यभर असंच प्रेम करत राहणार आहे. 

मी नेहमची तुझ्याशी जोडलेली राहीन कायम अगदी अनंत काळापर्यंत’

ADVERTISEMENT

सुशांत सिंह राजपूतचा हा फोटो तुम्हालाही करेल भावुक

रिया आणि सुशांत यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते

रिया आणि सुशांत यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते अशी माहिती रियाचा प्रॉपर्टी डीलर सनी सिंगने दिली होती. त्यासाठी ते घराच्या शोधातही होते. मात्र सुशांतच्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रियाने त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित तिच्या याच निर्णयामुळे सुशांतने इतका टोकाचा निर्णय घेतला. सुशांतने मरण्यापूर्वीही तिला फोन केला होता हे त्याच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले होते. सुशांतच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन जग हादरलं असून एक महिन्यानंतरही सावरू शकलेलं नाही. 

सुशांत सिंहच्या ‘दिल बेचारा’ चे ट्रेलर पाहून अनेक जणं झाले भावुक

14 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT