Advertisement

मनोरंजन

रिया चक्रवर्तीने शेअर केली ग्लॅमरस पोस्ट, सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच पोस्ट

Leenal GawadeLeenal Gawade  |  Sep 14, 2021
रिया चक्रवर्ती

Advertisement

 दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्यूनंतर चांगलीच चर्चेत आली होती.  पण ही चर्चा वाईट अर्थाने सुरु झाली होती. रियावर सुशांतच्या मृत्यूचा आरोप होता.  त्यामुळे रिया ही पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. रियाचे करिअर पूर्णपणे वाया जाईल अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता रियाचे आयुष्य पूर्ववत होऊ लागले आहे. ती तिच्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाली आहे. रियाने तिच्या अकाऊंटवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. त्यामुळे रिया इज बॅक असे म्हणावे लागेल.

नागाचैतन्य आणि समांथामधील वाद मिटवण्याचा नागार्जुन करत आहेत प्रयत्न

रिया दिसतेय खूपच ग्लॅमरस

रिया चक्रवर्तीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.  #naarishakti हा हॅशटॅग वापरत त्यांनी ही पोस्ट केले आहेत. ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील तिचा हा फोटो असून तिने लेदर काळ्या रंगाची पँट घातली आहे. तिने नेटेड असा बॉडीकॉन टॉप घातला आहे. तिने चेहऱ्यावर हात अशापद्धतीने ठेवला आहे की त्यामध्ये तिचा मेकअप दिसून येत नाही. पण तरीदेखील तिचा फोटो हा ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर खूप जणांनी कमेंट करत तिचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा परत येणार आहे असे दिसत आहे.

 इंडस्ट्रीपासून झाली दूर

 सुशांत सिंह राजपूत गेल्यापासून  रियाची इमेज पूर्णपणे बदलून गेली होती.  तिला आरोपीच्या पिंजऱ्यात अनेकांनी ठेवले होते. त्यामुळे तिचे आयुष्य खराब झाले होते. सुशांतच्या आत्महत्येसाठी ती जबाबदार असल्याचे अनेक पुरावे मिळाल्यामुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिची कसून चौकशी करण्यात आली होती. तिच्या चौकशीतून अनेकांची नावे समोर आली. त्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली. इतकेच नाही त्यातून ड्रग्जचा एक स्कॅमदेखील समोर आला होता. त्यामुळे या सगळ्या कालावधीत इंडस्ट्रीला तिला काही काळासाठी रामराम करावा लागला होता.

झाले नुकसान

रिया चक्रवर्ती या सगळ्यात अडकल्यापासून तिला अजिबात काम मिळालेले नाही.  त्यामुळे तिचे बरेच आर्थिक नुकसान झाल्याचे तिने अनेकदा सांगितले आहे. तिचा भाऊ आणि तिच्या कुटुंबियांना अनेक यातना यामुळे खूप काही सहन करावं लागलं आहे. त्यामुळे तिचे बरेच नुकसान झाले असे तिने अनेकदा सांगितले आहे. रियाचे दिवस आता नक्कीच बदलतील असे दिसून आले आहे. तिने या नव्या फोटोपासून ही नवी सुरुवात केलेली आहे. 

बिग बॉसमध्ये येणार का रिया

रिया चक्रवर्ती इतकी कॉन्ट्राव्हर्सीमध्ये आली होती की तिला बिग बॉसमध्ये बोलावण्यात येणार होते असे सांगितले जात होते. पण अद्याप त्याबद्दल कोणीही खात्री दिलेली नाही. सध्या तरी ती कोणत्याही कार्यक्रमात येणार नाही असेच दिसत आहे. पण तिचे हे कमबॅक नक्कीच खूप वेगळे आणि खास असणार आहे.

आता रियाचा हा फोटो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहा.

युट्युबर कॅरी मिनाटी अडचणीत, दिल्लीत गुन्हा दाखल