मनोरंजन

नव्या चित्रपटासाठी आर्ची सज्ज,नव्या प्रेमकहाणीत दिसणार नव्या रुपात

Leenal GawadeLeenal Gawade  |  Mar 16, 2021
नव्या चित्रपटासाठी आर्ची सज्ज,नव्या प्रेमकहाणीत दिसणार नव्या रुपात

आपल्या रांगड्या रुपाने लोकांना घायाळ करुन गेलेली अभिनेत्री रिंकु राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेमाची व्याख्या थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगण्यासाठी रिंकु एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याची अधिकृत घोषणा तिने तिच्या सोशल मीडियावर केली असून एक छोटासा व्हिडिओही शेअर केला आहे. #AathvaRangPremacha असा हॅशटॅग टाकत तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे ही एक प्रेमकहाणी असणार आहे यात काही शंका नाही. शिवाय चित्रपटाचे टायटलही या हॅशटॅगमुळे स्पष्ट होत आहे.या नव्या चित्रपटासाठी आर्ची सज्ज झाली असून ती या चित्रपटात एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.

कसा असेल प्रेमाचा आठवा रंग

रिंकूने आतापर्यंत काम केलेल्या चित्रपटांमध्ये तिने वैविध्यपूर्ण अशा लव्हस्टोरी केल्या आहेत. हा चित्रपटही एक लव्हस्टोरी असून त्याचे एक टायटल टीझर रिंकुने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हा एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक बॅकराऊंड म्युझिक पीस वाजत आहे. यामध्ये केवळ चित्रपटाच्या टीमची ओळख करुन देण्यात आली आहे. त्यामुळे रिंकून या चित्रपटात नेमक्या कोणत्या रुपात दिसणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही. पण या चित्रपटाच्या टीमचा विचार करता यामध्ये मकरंद देशपांडे आहेत. शिवाय या चित्रपटातून एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे विशाल आनंद. त्यामुळे आता ही व्यक्ती कोण? आणि यामध्ये ‘आठवा रंग प्रेमाचा’ नेमका कसा दाखवण्यात येईल याची उत्सुकता अनेकांना आहे. 

लवकरच होणार ‘बंटी और बबली 2 ‘चं ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान देणार सरप्राईझ

रिंकुने केलं वजन कमी

गेल्या काही महिन्यांपासून रिंकू तिचे वजन कमी करण्याच्या मागे लागलेली आहे. ती तिच्या अनेक पोस्टमधून तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन दाखवत असते. घऱगुती आहार आणि व्यायाम करुन तिने हा बदल घडवून आणला आहे. तिचे आधीचे काही फोटो पाहता हा नवा लुक अनेकांना आश्चर्यचकित करेल असा आहे. रिंकूने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली होती. ते तिच्या कित्येक पोस्टमधून दिसत आहे. तिचे अनेक नवे फोटो याची साक्ष आहे. सैराटमधील धिप्पाड आर्ची आता एखाद्या मॉडेलसारखी सुडौल झाली आहे. त्यामुळे ती आता अधिकच सुंदर दिसत आहे.

लग्नानंतर मिताली मयेकरचा अधिक बोल्ड लुक, कमेंट्सचा वर्षाव

वेबसिरिजमधून दिसली रिंकू

चित्रपटांनाच धरुन न राहता रिंकूने वेबसिरिजमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. तिने अनेक मोठ्या सीरिज या दरम्यान केल्या आहेत. त्यामुळे तिने ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. मराठी नाही तर हिंदी सिरिजमधून काम करत तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तिची Unpaused नावाची सिरिज सुरु आहे. ज्या माध्यामातून तिला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पण आता पुन्हा एकदा रिंकू मराठी चित्रपटातून दिसणार आहे.  हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार अशी माहिती रिंकूने दिली आहे.

दरम्यान, या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रिंकूच्या लुकसाठी आणि ती कोणासोबत या चित्रपटात दिसणार आहे यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

ड्रामा क्वीन राखी सावंतने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी