सैराटमधील आर्ची आता खूपच बदलली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुची ओळख ही या चित्रपटामुळे असली तरी देखील नवनवीन प्रोजेक्टमुळे आणि तिच्यात होत जाणाऱ्या बदलामुळे तिची अधिकाधिक चर्चा रंगत असते. सैराट असो की हल्लीच आलेला ‘मेकअप’ हा चित्रपट असू दे. या चित्रपटात बदललेली रिंकू दिसली होती. पण आता रिंकूचे नवे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही तिला पटकन ओळखूच शकणार नाही. कारण रिंकू राजगुरुने या फोटोमध्ये कमालीचा फिटनेस गाठल्याचे दिसत आहे. मराठीच नाही तर इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करायचे असेल आता उत्तम फिगर ही असायलाच हवी या समीकरणात बसण्यासाठीच रिंकू इतकी मेहनत घेताना दिसत आहे.
काय काका मुलगी पाहिली नाही का,राखीने विचारला प्रश्न
झीरो फिगर रिंकू
आतापर्यंत रिंकूला आपण थोड्या धिप्पाड अशा भूमिकेत पाहिले आहे. तिला अद्याप ऑनस्क्रिन खूप बारीक किंवा झीरो फिगर पाहिलेले नाही. पण आता रिंकू सगळ्यांना झीरो फिगर लुकमध्ये दिसणार आहे. चित्रपट किंवा सिरिजमध्ये ती कधी दिसेल माहीत नाही. पण सध्या तिचा हा नवा लुक तुम्हाला इन्स्टाग्रामवर बघता येणार आहे. कारण तिने गेल्या काही दिवसांपासून तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची बारीक दिसत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका क्रॉप टॉपमध्ये आहे. तिचा हा टी शर्ट वर्कआऊट केल्यामुळे घामाने भरलेला आहे. पण तिच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यायामानंतरचा हा आनंद आहे असेच म्हणावे लागेल.
पर्ल व्ही. पुरीबाबत ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे, पण कलाकारांचा पर्लला पाठिंबा
या आधीही केलेत फोटो शेअर
रिंकूने या आधीही तिच्या फिटनेसचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ती व्यायाम करुन शरीर कमावतेय हे आधीच सगळ्यांना माहीत होते. कारण ती तिचे फोटो सतत शेअर करते. या आधीही तिने ती बारीक झालेली दिसत आहे. पण आता तिच्या या फोटोमध्ये तिने झीरो फिगर गाठलेली आहे. असे म्हणावे लागेल. या आधीच्या तिच्या फोटोमध्ये आणि आतामध्ये दिसणारा हा कमालीचा फरक खूपच सुखावणारा आहे म्हणूनच तिला अनेक जण तिच्या डाएट आणि फिटनेसचा फंडा शेअर केला आहे.
नव्या कथानकासह ओह माय गॉड 2, अक्षयकुमारसोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत
सीरिजमध्येही उत्तम काम
रिंकू लॉकडाऊनच्या काळात 100 नावाच्या हिंदी सीरिजमध्ये दिसली होती. या मालिकेतील तिची भूमिका देखील खूपच मस्त होती. तिला अशा भूमिकेत पाहून खूप जणांना पुन्हा एकदा ती आवडली होत. नेत्रा नावाची भूमिका तिने यामध्ये साकारली होती. जी फारच जबरदस्त होती. इतकेच नाही तर ती यामध्ये फार महत्वाच्या अशा भूमिकेत होती. आता याचा नवा सीझन येईल अशी प्रतिक्षा अनेकांना आहे. पण अद्याप याची कोणतीही घोषणा झालेली नाही.
मराठी कलाकारांचा फिटनेस फंडा
आता मराठी कलाकार हे फिटनेसच्या बाबतीत आता फारच सजग झालेले आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असतात. त्यामुळे आता मराठी कलाकारही आपला फिटनेस अगदी योग्य पद्धतीने राखतात. डाएट आणि मेहनत करत ते आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेताना दिसतात
आता झीरो फिगर करण्याचा विचार करत असाल तर तु्म्हाला रिंकूसारखी मेहनत करणे अनिवार्य आहे.