बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल, परदेस , कहो ना प्यार है, वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता ते प्रथमच दिग्दर्शन करत असून त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . अदृश्य हा थ्रिलर मराठी चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग ,मंजिरी फडणीस आणि एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा एकदा रितेश देशमुख दिसणार आहे. रितेशने मराठीत अत्यंत तगडे चित्रपट केले असून पुन्हा एकदा रितेश मराठी चित्रपटात दिसणार याचा नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद होणार आहे.
KKK11 – स्पर्धकांची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच आठवड्यात निक्की बाहेर
20 वर्षांनंतर रितेश आणि कबीर लाल एकत्र
विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख 20 वर्षानंतर पहिल्यांदा काम करत आहेत. रितेशचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते. या विषयी रितेश म्हणतो मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत. सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग बघायला मी गेलो होतो त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल की मला अभिनेता बनायचे आहे. पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच चित्रपटाने माझ्या फिल्मी करिअरला सुरवात झाली आणि आयुष्याला वेगळे वळण मिळाले. रितेश पुढे म्हणाला की, 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्यासोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचा मी एक भाग आहे ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आहे.
पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री
पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले
या चित्रपटात अजय कुमार सिंह, अनंत जोग हे नावाजलेले अभिनेते आहेत. याशिवाय पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीससह सौरभ गोखलेदेखील या चित्रपटात दिसणार आहे. तर साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे. लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा रितेशला मराठी चित्रपटात पाहण्यासाठी नक्कीच चाहते उत्सुक असतील. दरम्यान पुष्कर आणि मंजिरीची जोडी पडद्यावर काय कमाल दाखवणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर या चित्रपटाचे नक्की काय कथानक असणार आणि इतक्या तगड्या अभिनेत्यांना एकत्र पाहायला मिळणार याचा प्रेक्षकांना आनंद झालेला दिसून येत आहे. तसंच रितेश देशमुख आता मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा मराठीत कधी दिसणार याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र अजून रितेशने कोणताही नवा चित्रपट करणार असल्याचे घोषित केले नसले तरीही सध्या सोशल मीडियावर मात्र रितेश नेहमीच अॅक्टिव्ह दिसून येतो आणि त्याचे रिल्सदेखील त्याच्या चाहत्यांना भरपूर आवडतात.
तामिळ अभिनेता सिद्धार्थला केलं मृत घोषित,युट्युबकडे केली तक्रार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक