ADVERTISEMENT
home / मनोरंजन
riteish-deshmukh-being-emotional-on-last-day-of-directorial-debut-movie-ved-in-marathi

‘वेड’चं चित्रीकरण पूर्ण, रितेश झाला भावूक

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हे नाव चित्रपटसृष्टीला नवे नाही. आपल्या अभिनयाने रितेशने अनेकांना आपलंसं केलं आहे. तर रितेश – जेनेलियाची जोडी म्हणजे विठ्ठल – रखुमाई असंच म्हटलं जातं. रितेशने विठ्ठल – रखुमाईच्या आशिर्वादाने मराठी चित्रपटात पाऊल ठेवलं आणि ‘लय भारी’ चित्रपटाला तुफान यश मिळालं. अत्यंत मासी असा चित्रपट रितेश मराठी रसिकांसाठी घेऊन आला. आता लवकरच रितेशने दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपट ‘वेड’ हा लवकरच चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. रितेश आणि सलमानची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. अगदी एका शॉटसाठी रितेशच्या पहिल्या मराठी चित्रपटातही सलमानने (Salman Khan) काम केले होते. तर आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रितेशने याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

रितेश झाला भावूक, सलमान खानही दिसणार 

Salman Khan and Riteish Deshmukh on Set

रितेशने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक या भूमिकेतून रितेश प्रेक्षकांसमोर येणार आहे. कोणतीही पहिली गोष्ट ही नक्कीच प्रत्येकासाठी खास असते. त्यामुळे रितेशने भावूक पोस्ट केली आहे. 

‘आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 

पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. 
अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय  चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. 
थँक्यु भाऊ. लव यू. 
तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे .
आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच…रितेश विलासराव देशमुख’

ADVERTISEMENT

अशोक सराफ यांचीही महत्त्वाची भूमिका 

काही दिवसांपूर्वी अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या वाढदिवसालाही रितेशने भावूक होती पोस्ट शेअर केली होती. अशोक सराफ यांच्यासारख्या कसदार अभिनेत्यासह काम करायला मिळणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. रितेशच्या या चित्रपटात अशोक सराफ यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आता प्रेक्षकही खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नक्की कधी घोषित होणार याचीच आता सगळीकडे उत्सुकता आणि आतुरता आहे. याशिवाय या चित्रपटात जेनेलिया (Genelia Deshmukh) देखील दिसणार का आणि तिची काय भूमिका असणार याविषयीदेखील उत्सुकता दिसून येत आहे. जेनेलियाला आतापर्यंत कोणीही मराठी बोलताना ऐकलं नाही. मात्र ती नेहमीच आपल्या मुलांना मराठी कुटुंबाचे संस्कार देताना दिसून आली आहे. रितेशदेखील या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना कामही करणार का असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट भेटीला येईल आणि प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा रसिक चाहते करताना दिसून येत आहेत. 

Ved Movie Set

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT