ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
रितेश देशमुखने ‘मिस्टर मम्मी’साठी वाढवलं वजन, व्हिडिओ व्हायरल 

रितेश देशमुखने ‘मिस्टर मम्मी’साठी वाढवलं वजन, व्हिडिओ व्हायरल 

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख नेहमीच त्याच्या अभिनय आणि लुक्सने सर्वांची मनं जिंकून घेतो. मात्र त्याचे आणि जेनेलियाचे मजेशीर व्हिडिओ सर्वात जास्त चाहत्यांचे निखळ मनोरंजन करतात. कोरोनाच्या काळात या जोडीने शेअर केलेल्या व्हिडिओजमुळे चाहत्यांना नकारात्मक वातावरणातही मनसोक्त हसता आलं होतं. आता रितेशने अजून एक फनी व्हिडिओ त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडिओ म्हणजे त्याच्या अकाउंटवरूल एक  वैयक्तिक पोस्ट नसून त्याच्या आगामी चित्रपट मिस्टर मम्मी या चित्रपटाचे प्रमोशन आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख लवकरच मिस्टर मम्मीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

रितेशचा हा व्हिडिओ खरंच आहे भन्नाट

रितेश देशमुखने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो इतकं जेवताना दिसत आहे की त्याच्या शर्टाची काही बटणं निघाली आहेत. या व्हिडियोवर त्याने कॅप्शन लिहिली आहे की, “जेव्हा तुमचा दिग्दर्शक तुम्हाला मिस्टर मम्मी चित्रपटासाठी वजन वाढवायला सांगतो ” हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी रितेशने कॅप्शन दिली आहे की, ही तर कालरी मील आहे. या व्हिडिओमध्ये रितेशने त्याचे पोट वाढवलेलं दिसत आहे.कारण ते त्याच्या शर्टातून चक्क बाहेर डोकावत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की काही चाहत्यांनी रितेशला कितवा महिना अशी कंमेट केली आहे. काहींनी त्याला प्रोस्थेटिक लावण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने कंमेट केली आहे की पाचव्या आणि सहाव्या बटनाचं काय करायचं. अशा प्रकारे या व्हिडिओवर लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव होत आहे.

मिस्टर मम्मी लवकरच प्रेश्रकांच्या भेटीला

रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी लवकरच मिस्टर मम्मी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भरपूर वर्षांनी जेनेलिया चित्रपटात कमबॅक करत आहे. शिवाय या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास चाहतेही खूप उत्सुक आहेत. कारण रितेश आणि जेनेलिया बॉलीवूडची एक फेमस जोडी आहे. मिस्टर मम्मी एक विनोदी चित्रपट असून यात रितेश आणि जेनेलिया दोघंही गरोदर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत भुषण कुमार… त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल अधिक उत्कंठा नक्कीच लागली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
05 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT