लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सोशल मीडियामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. वेगवेगळे ट्रेडिंग व्हिडिओ करण्यासाठी अनेकांना इतका वेळ मिळाला आहे की, जिथे तिथे या सोशल प्लॅटफॉर्मचीच चर्चा होताना दिसत आहे. आता सध्याचा एक नवा ट्रेंड म्हणजे ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ हो! हे गाणं तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकले असेल. हा ट्रेंड अनेकांनी फॉलो करत यावर व्हिडिओ बनवले आहेत. आता याच गाण्यावर रितेश देशमुखने एक धमाल व्हिडिओ शेअर केला आहे. एक नारळ दिलाय म्हणत त्याने त्याच्या अंदाजात हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून त्याच्यावर लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. जाणून घेऊया रितेशच्या या धमाल व्हिडिओविषयी
मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर, दिग्दर्शक सुबोध भावेचा नवा चित्रपट
एक नारळ दिलाय
रितेश कायम त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रिल्स व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने हा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने यामध्ये कुडता घातला असून अगदी हिपहॉप स्टाईलमध्ये तो हे गाणं स्वत:च गात आहे असे यामध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर रितेश देशमुखने कॅप्शन लिहीत सध्या गाण्याच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे. त्याने या गाण्याचे संगीतकार आणि गायक यांना देखील त्यामध्ये टॅग केले आहे. रितेशने हा व्हिडिओ शेअर केल्या केल्याच त्याला लाईक्सचा पाऊस पडू लागला आहे. रितेशचे रिल्स हे नेहमीच वेगळे आणि क्रिएटिव्ह असतात. त्यामुळेच खूप जणांनी त्याला रिल्स किंग असेही म्हटले आहे.
रितेश आणि तिचे रिल्स
रितेश आणि जेनेलिया ही जोडी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये त्यांनी त्यांचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहे. जेनेलियासोबत आणि एकट्याने केलेले त्याचे व्हिडिओ कायमच हिट असतात. एका आयडियल कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याची प्रोफाईल कायमच कलरफुल असते. तो वेगवेगळे व्हिडिओ कायम शेअर करत असतो.
लॉकडाऊन उत्तर नाही’असे ट्विट करणाऱ्या महेश कोठारेंवर नेटीझन्सची टीका
रितेशचा तो व्हिडिओ आणि जेनेलियाचे उत्तर
मध्यंतरी सोशल मीडियावर एका अॅवार्ड सोहळ्यातील एक व्हिडिओ चांगलाच गाजला होता. रितेश प्रीती झिंटाशी फार अदबीने बोलत होता आणि तिच्या मागे उभी असलेली जेनिया मात्र फार गोंधळात पडल्यासारखी रितेशकडे पाहात होती. त्यामुळे या व्हिडिओने एक वेगळाच गोंधळ सोशल मीडियावर केला. खूप जणांना जेनेलियाला या गोष्टीची भीती वाटत असावी की आपला नवरा दुसऱ्या अभिनेत्रीशी बोलत आहे तर पुढे काय? पण लोकांच्या या प्रश्नांना आणि त्यांच्या गैरसमजाला जेनेलियाने एकदम झक्कास उत्तर देत सगळ्यांचे तोंड बदं केले. तिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्याबद्दल नको ती चर्चा करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. या शिवाय वेगवेगळे ट्रेंड फॉलो करणारे अनेक व्हिडिओ या दोघांनी त्यांच्या प्रोफाईलवर शेअर केले आहेत.
दरम्यान, रितेशला तुम्ही अजूनही फॉलो केले नसेल तर आताच करा कारण या लॉकडाऊनमध्ये त्याच्याकडून अनेक चांगले व्हिडिओ येतील अशी अपेक्षा आहे.
कोरोना कर्फ्यू’ लागण्याआधीच रणवीर आणि दीपिकाचा मुंबईला बायबाय