ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘सिम्बा’चा वर्ष अखेरीस बोलबाला, पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई

‘सिम्बा’चा वर्ष अखेरीस बोलबाला, पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग पहिल्यांदाच ‘सिम्बा’मधून एकत्र आले आणि गेले महिनाभर चर्चा असलेल्या या चित्रपटाचाच सगळीकडे सध्या बोलबाला आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ सगळ्याच चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. रोहित शेट्टीला नक्की कसा मसालेदार चित्रपट बनवायचा याची पूर्ण माहिती आहे. योग्य तडका देऊन रोहित शेट्टीने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं आहे. तसंच रणवीरच्या अभिनयाचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य वापरही रोहित शेट्टीने करून घेतला आहे. तब्बल 11 मराठी कलाकारांची फौज घेऊन हिंदीमध्ये पहिल्यांदाच अशा तऱ्हेचा चित्रपट काढण्यात आला आहे. तसंच पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरने केली आहे. हा चित्रपट म्हणजे संपूर्ण मसाला चित्रपट असून वर्षाच्या शेवटी आलेला अप्रतिम मसालेदार चित्रपट आहे.

3-Simmba-trailer-Rohit-and-ranveer
पहिल्याच दिवशी 15 कोटींची दणदणीत कमाई

मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या शाहरूख खानच्या ‘झिरो’ने प्रेक्षकांची साफ निराशा केली. मात्र ‘सिम्बा’ने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणले आहे. रणवीर आणि साराची जोडी, रोहित शेट्टीचा मसाला या सर्वामुळे प्रेक्षक सध्या ‘सिम्बा’ बघायला उत्सुक आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली असून या दोन दिवसात साधारण 25 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता ट्रेड अनालिस्टने वर्तवली आहे. शिवाय इतर देशांमध्येही या चित्रपटाला चांगलं ओपनिंग मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियामध्येही अफलातून प्रतिसाद

ADVERTISEMENT

भारतामध्ये साधारण 4020 तर जगभरामध्ये 963 स्क्रिन्सवर ‘सिम्बा’ प्रदर्शित करण्यात आला आहे. दुबईमध्ये गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला असून लोकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून मिळत आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्येही पहिल्याच दिवशी ‘सिम्बा’ने 88.58 लाख इतकी भरघोस कमाई केली आहे. पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम केलेल्या रणवीर सिंगच्या कामाचं प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. रणवीरने याआधीही आपल्या अभिनयाची छाप ‘रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारख्या चित्रपटांमधून पाडली आहे. मात्र अशा तऱ्हेचा मसाला चित्रपट पहिल्यांदाच रणवीर सिंग करत असून हा चित्रपट कदाचित त्याच्याशिवाय कोणीच करू शकला नसता इतकी छाप रणवीरने पाडली आहे. रोहितचा खास टच असलेल्या या चित्रपटामध्ये रणवीरच्या कामाचं विशेष कौतुक सर्व चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

मराठी कलाकारांनाही अप्रतिम प्रतिसाद

रोहित शेट्टीच्या चित्रपटात नेहमीच मराठी कलाकारांना विशेष काम असतं. या चित्रपटात तर मराठी कलाकारांची फौजच आहे. हिंदीमध्ये अशा तऱ्हेचा हा पहिलाच चित्रपट असेल ज्यामध्ये इतके मराठी कलाकार असून चित्रपटावर संपूर्ण मराठी छाप आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकही साहजिकच चित्रपटगृहाकडे आकर्षित होत आहे. एकंदरीतच या आठवड्यात आणि वर्षाच्या शेवटी ‘सिम्बा’ने आपली छाप सर्वांच्या मनावर सोडली आहे आणि ‘सिम्बा’चाच बोलबाला दिसून येत आहे.

29 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT