ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित

रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित

दिग्दर्शक आणि निर्माता रोहीत शेट्टीने एखाद्या चित्रपटाची घोषणा केली की तो चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत चाहत्यांना आतूरता लागून राहते. कारण आजवर प्रदर्शित झालेल्या रोहीत शेट्टीच्या सर्व चित्रपटांनी चित्रपटगृहात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. गोलमालचे सीक्वल, सिंघम, सिम्बानंतर चाहत्यांना आता सूर्यवंशी पाहण्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या दिवाळीला रोहीत शेट्टी चाहत्यांना सूर्यवंशीची भेट देणार आहे. पण एवढंच नाही त्याने पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठी रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या सर्कसच्या प्रदर्शनाची तयारीही सुरू केली आहे.

कार्तिक फेम मोहसिन खानने सोडली ‘ये रिश्ता क्या कहलाता है मालिका’

काय आहे रोहीत शेट्टीचा सर्कस

रोहीत शेट्टी सध्या यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या सूर्यवंशीच्या प्रमोशनच्या तयारीत गुंतलेला आहे. पण त्याने याच प्रमोशनदरम्यान त्याच्या आगामी चित्रपट सर्कसची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहीत शेट्टी पुढच्या दिवाळीला सर्कस हाल धमाल कॉमेडी चित्रपट प्रदर्शित करणार आहे. हा चित्रपट हास्य व्यंगावर आधारित असेल. पुढील पाच महिन्यामध्ये रणवीरचे लागोपाठ तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ज्यामध्ये 83, जयेशभाई जोरदार आणि रोहीतच्या सूर्यवंशीचा समावेश आहे. यासाठीच सर्कस रोहीतने पुढील वर्षीच्या दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण जर या चित्रपटांच्या दरम्यान त्याने सर्कस प्रदर्शित केला तर त्याचा हवा तसा फायदा होणार नाही. त्यामुळे थोड्या गॅपने त्याला त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणायचा आहे. सहाजिकच यासाठी पुढच्या दिवाळीसारखी संधी उत्तम ठरणार आहे. कारण दिवाळीच्या वातावरणामध्ये कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजतात असा त्याचा अंदाज आहे. म्हणूनच त्याने सर्कससाठी पुढच्या दिवाळीच्या मुहूर्ताची निवड केली आहे.

इम्ररान हाश्मी आणि निकिता दत्ताचा डीबक : दी कर्स इज रिअलचं टीझर प्रदर्शित

ADVERTISEMENT

सर्कसबद्दल निर्माण झाली उत्सुकता

सूर्यवंशीनंतर रोहीत लगेच त्याचा आगामी चित्रपट सर्कस कधी प्रदर्शित होणार याची घोषणा करणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिसच्या मुख्य भूमिका असणार आहेत. एका विशेष गाण्यात दीपिका पादुकोणचा समावेशही असेल. या गाण्यात दीपिका चेन्नई एक्सप्रेसमधील मीनाम्मा साकारणार आहे. सर्कस चित्रपटात विलियम सेक्सपिअरच्या दी कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकाचे रूपांतर दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये दोन जुळे मालक आणि दोन जुळे नोकर दाखवण्यात आले आहेत. लहानपणी हरवल्यानंतर मोठेपणी जेव्हा ते एकत्र येतात त्यातून मजेशीर गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे पुढच्या दिवाळीला रोहीतच्या सर्कसमुळे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

अंतिम” च्या प्रदर्शन तारखेमुळे होणार मराठी चित्रपटाची गळचेपी

21 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT