बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक झाल्यापासून तिच्या वागण्यात बराच फरक पडला आहे. तिचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती एका वेगळ्याच ऐटीत दिसत आहे. विजयाची झिंग तिच्या डोक्यात इतकी चढली आहे की, ती त्याच तोऱ्यात सगळीकडे वावरताना दिसत आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी तिला एवढी प्रसिद्धी दिली. त्याच्यांच सोबत तिचे अशा पद्धतीचे वागणे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. खेळात राहून चांगुलपणा शिकवणारी रुबिना आता अचानक अशी वागू लागल्यामुळे तिला विजेता बनवल्याचे दु:ख अनेकांना होऊ लागले आहे. सोशल मीडियावर रुबिना ट्रोल होऊ लागली आहे.
राखी सावंतचा हा फनी व्हिडिओ तुम्ही पाहिलात का, अजूनही आहे बिग बॉसच्या घरात
एअरपोर्टवर केला अपमान
रुबिना चॅनेलचा आदर्श चेहरा आणि आदर्श सून अशा भूमिकांमधून दिसली आहे. काही अंशी आपली अशी ओळख तिने बिग बॉसमध्येही टिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच ती विजेतेपदापर्यंत पोहोचली. पण त्यानंतर तिच्या वागण्यात पडलेला फरक तिच्या या नव्या व्हिडिओमध्ये अगदी सहज पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावर पापाराझींनी रुबिनाला स्पॉट केले आणि तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्नही केला पण तिने ज्या पद्धतीने पत्रकारांना धुडकावले हे पाहून तिला विजयाचा गर्व झाला आहे असेच दिसत आहे. बरेचदा सेलिब्रिटी त्यांचा मूड खराब असल्यावर फारसा प्रतिसाद देत नाहीत ही गोष्ट खरी असली तरी ते अशापद्धतीने पापाराझींना वागवत नाहीत. त्यामुळेच रुबिनाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
रुबिनाही गर्विष्ठच
बिग बॉस या रिॲलिटीशोमध्ये रुबिनाचा प्रतिस्पर्धी आणि या खेळाचा खरा विजेता अशी ओळख असलेला राहुल वैद्य. हा अनेकांचा चाहता होता. पण रुबिनाच्या फॅनफोलोविंगपुढे त्याला तिच्याहून जास्त मतं मिळाली नाहीत. राहुल आणि रुबिनाचे या घरात कायम भांडण असायचे. राहुल प्रत्येक भांडणात रुबिनाच्या याच वागण्याबद्दल सतत सांगायचा. त्यावेळी अनेकांना राहुलच चुकीचा आहे असे वाटले होते. पण रुबिनाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राहुल बरोबर होता असेच म्हणायला हवे. रुबिनाच्या याच वागण्यावर त्याने कायम प्रश्नचिन्ह उभे केले होते. तिच्या अशा वागण्यावरुन तिला अनेकदा सलमानही बरेच काही बोलला होता. पण तिच्या वागण्यात फरक पडला नाही. तिचा पती आणि या गेम शोचा स्पर्धक अभिनव शुक्ला यानेही राहुलला खोट्यात पाडून या खेळामध्ये आपली पत्नी श्रेष्ठ असल्याचे सगळ्यांना भासवले होते. एक आदर्श कपलप्रमाणे त्यांचे वागणे असल्यामुळे अनेकांना ही जोडी फारच आवडत होती. पण आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांची मत बदलून गेली आहेत. तिच्या बद्दल असलेला आदर हा बऱ्यापैकी कमी झाला आहे.
जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सीक्वलमध्ये आलिया, तरूणींच्या जीवनावर आधारित आहे कथा
रुबिनाने राहुलची केली निंदा
खेळात प्रतिस्पर्धी असलेल्या राहुल वैद्यने रुबिना जिंकली याचा आनंद व्यक्त केला होता. पण राहुलविषयी रुबिनाने आणि अभिनवने कायमच एक प्रतिमा तयार करुन ती मलिन करण्याचा प्रयत्न केला. पण असे असूनही राहुल वैद्यने घराबाहेर पडताना आणि रुबिनाला विजेता म्हणून घोषित केल्यानंतर त्याने तिचे अभिनंदन केले. हाच फरक राहुल आणि रुबिनामध्ये दिसून आला. त्यामुळे या खेळाचा खरा विजेता हा राहुल झाला असे म्हणायला काहीच हरकत नाही.
तुम्हाला रुबिनाच्या अशा वागण्याबद्दल नेमके काय वाटते, आम्हाला नक्की कळवा
महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँ ची हजेरी