एखाद्या सेलिब्रिटींनी कोणासोबतही फोटो शेअर केला की, त्यांच्या प्रेमाची चर्चा जोर धरु लागते. बरेचदा एकत्र काम करता करता अनेकांची अफेअर्स झाली आहेत आणि त्यांनी लग्नही केली आहे. इंडस्ट्रीमध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत. त्यात आता आणखी एका ऑनस्क्रिन जोडीची भऱ पडणार आहे का? अशी चर्चा जोर धरु लागली आहे. आम्ही बोलत आहोत. तुमच्या लाडक्या शुभ्रा आणि सोहमविषयी…. म्हणजे तेजश्री प्रधान- आशुतोष पत्की याच्या विषयी. आशुतोषने शेअर केलेला एक फोटो आणि त्यानंतर होणारी चर्चा यामुळे आता ते लवकरच त्यांच्या नात्याची घोषणा करणार की, काय असा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय?
गायिका नीती मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म, केले शेअर
आशुतोषने केला फोटो शेअर
आशुतोषने तेजश्री प्रधानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा आणि तेजश्रीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याने खास तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केला आहे. त्याने या पोस्टमध्ये तिचा उल्लेख बेस्ट फ्रेंड असा केला आहे. शिवाय तिने केलेला सपोर्ट आणि प्रोत्साहन या विषयीही त्याने यामध्ये म्हटले आहे. पण सगळ्यात महत्वाची आणि वाचण्यासारख्या ओळी म्हणजे त्याने तेजश्रीला दिलेला सल्ला. त्याने पोस्टमध्ये तेजश्रीला भूतकाळातील गोष्टी विसरुन जा असा सल्ला दिला आहे. तर दुसरी टीप देताना त्याने गिफ्ट विसरुन जा असा खोडसाळ विनोदही तिच्यासोबत केला आहे. पण भूतकाळ विसरुन जाण्याची टीप किंवा सल्ला हा लोकांना अधिक आवडलेला दिसत आहे. कारण त्याचवरुन काही चाहत्यांनी त्यांना थेट गोड बातमी कधी देताय? नात्याची घोषणा कधी करताय? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळेच या सगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता हे दोघं खरेच मित्र आहेत की आणखी काही याची ती दोघं माहिती देत नाही तोपर्यंत ही केवळ वाऱ्यावरची बातमी आहे असेच म्हणावे लागेल.
Bigg Boss च्या नव्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा
एकदम गोड जोडी
आता या फोटोवर आलेल्या काही कमेंट्स पाहिल्यानंतर खूप जणांना या दोघांनी एकत्र राहावे, लग्न करावे अशीच इच्छा आहे असे दिसून येत आहे. त्यामुळेच अनेकांनी त्यांच्या या फोटोवर चर्चा करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या कमेंटस वाचल्यानंतर लोकांच्या मनातही त्यांना पाहण्याची इच्छा आहे असे दिसून येत आहे. ही दोघे ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत दिसली होती. त्यामध्ये त्यांची जोडी अनेकांना आवडली होती. अगदी खऱ्या आयुष्यातली जोडी वाटावी अशी ही जोडी होती. त्यामुळेच लोकांना या दोघांनी एकत्र यावे असे वाटणे स्वाभाविक आहे.
ती सध्या काय करते?
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर आता नवीन आलेली मालिका म्हणजेच ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत सोहम आणि शुभ्रा बदललेले आहेत. हे कलाकार जरी अनेकांच्या पसंतीला उतरले असले तरी देखील जुना सोहम आणि शुभ्रा ही काही केल्या विसरता येण्यासारखे नाही. पण या दोघांनी काही कारणास्तव याच्या पुढच्या भागाला नकार दिल्यामुळे ही दोघेही सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहेत हे नक्की!
कृष्णा अभिषेकला आली चीची मामाची आठवण, शेअर केला गोविंदासोबत फोटो
फिरण्याची आवड
तेजश्री आणि आशुतोषला फिरण्याची खूपच आवड आहे. आशुतोष आणि तिने एकत्र अनेक प्रवास केले आहेत. हे त्यांच्या काही फोटोजमध्ये नक्कीच जाणवते. पण आता त्यावरुन रिलेशनशीप किंवा नात्याचा अंदाज काढणे हे तितकेसे चांगले नाही.
आता तुम्हाला काय वाटते ? या दोघांनी एकत्र यायला हवे की नाही ते आम्हाला सुद्धा कमेंट करुन कळवा.