ADVERTISEMENT
home / मनोरंजन
महेश बाबू दिसणार बॉलिवूडमध्ये

साऊथचा हा सुपरस्टार करणार आहे का  बॉलिवूडमध्ये पदार्पण

पत्नी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि तो साऊथचा सुपरस्टार असं कॉम्बिनेशन असलेली जोडी म्हणजे महेश बाबू (Mahesh Babu- नम्रता शिरोडकर.Namrata Shirodkar) महेश बाबू साऊथ चित्रपटांचा जीव आहे हे आपण सगळेच जाणतो. साऊथचे चित्रपट वगळता त्याने आतापर्यंत कोणतेही चित्रपट केेलेले नाहीत. शांत, सुस्वभावी, प्रसिद्ध असूनही कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये नसलेला हा कलाकार केवळ बॉलिवूड विरोधात एक स्टेटमेंट करुन प्रकाशझोतात आला. त्याच्या मूळ वाक्याला थोडेसे वळवून काहींनी त्याची कॉन्ट्राव्हर्सी केली खरी.. पण आता हाच कलाकार बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. त्यामुळे ज्या हिंदी भाषिकांची मने दुखावली आहेत. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. पण कोणत्या प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे त्याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती

 या प्रसिद्ध चित्रपटात दिसणार महेश बाबू

महेश बाबू एका कार्यक्रमादरम्यान

महेश बाबू तेलगु चित्रपटातील सगळ्यात मोठे प्रोजेक्ट करतो. त्याचे चित्रपट यशस्वी होणार यात कोणतीही शंका नसते. नुकताच येऊन गेलेला एस. एस. राजमौली ( s.s.Rajmouli) यांचा चित्रपट RRR या चित्रपटाच्या पुढच्या भागात महेश बाबू दिसणार आहे अशी माहिती मिळत आहे. पण अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. शिवाय हा चित्रपट मूळ साऊथचाच असल्यामुळे महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. हिंदीमध्ये हा चित्रपट आधीही डब जाला होता आणि आताही होणार आहे. त्यामुळे त्याची चूक लक्षात आल्यामुळे तो बॉलिवूडमध्ये पर्दापण करतोय असे अजिबात नाही. पण तरीही या चित्रपटात तो दिसणे म्हणजे अनेकांसाठी ती पर्वणी असणार आहे. 

नुकताच दिसला सरकार वारु… चित्रपटात

महेश बाबूचा नुकताच एक सुपरडुपर हिट चित्रपट येऊन गेला आहे. या चित्रपटातील गाणी ही आधीच प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत किर्ती सुरेश झळकली होती. या चित्रपटात त्याची मुलगी सितारा गट्टमणी ही देखील झळकली. युट्युबस्टार असलेली सितारा या चित्रपटातील एका  खास गाण्यात दिसली होती. सध्या महेश बाबूचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याची चर्चा होत असताना RRR या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत तो दिसणार आहे असे सांगितले जात आहे. 

बॉलिवूडबद्दल केले होते हे विधान

मेकअप करताना महेश बाबू

खरंतरं महेश बाबू कोणत्याही भानगडीत कधीही पडत नाही. त्याचा चित्रपट झाल्यानंतर तो त्याचे  प्रमोशन आणि आभार मानण्यापलीकडे तसे फारसे काही करत नाही. पण महेश बाबूने एका कार्यक्रमादरम्यान मी साऊथ चित्रपटात खूश असल्याचे म्हटले होते. त्याला आता काहीही करायची इच्छा नाही. पण त्याचा खूप जणांनी चुकीचा अर्थ काढला आणि त्याचे वाक्य चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे तो वाद निर्माण झाला होता. पण त्यालाही अनेकांनी चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे नको तो वाद झाला होता. 

ADVERTISEMENT

आता या नव्या अफवेनंतर त्याच्या आयुष्यात नेमका काय फरक पडेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

07 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT