ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
सलमान खानला सुपरस्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

सलमान खानला सुपरस्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

हम आपके है कौन, हम साथ-साथ है आणि विवाह यासारखे कौटुंबिक चित्रपट बनवून यश मिळवणारे प्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबाबतच ट्वीट राजश्री या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने करून श्रद्धांजली वाहिली आहे.

राजश्रीने ट्विटरवर राजकुमार बडजात्या यांना श्रद्धांजली वाहत असं लिहीलं आहे की, ‘सूरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या आता आपल्यात नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ तसंच चित्रपट समीक्षक अक्षय राठी आणि तरन आदर्श यांनीही याबाबत ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आहे.

राजश्रीने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहीट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांमध्ये ‘चितचोर’,’मैने प्यार किया’,’हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’ आणि ‘विवाह’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांचा समावेश आहे.

त्यांनी सलमान खान असलेला ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपटही प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट 2015 साली आला होता आणि त्याने चांगली कमाईही केली होती.

ADVERTISEMENT

51168476 1255683454607347 5053089570311516464 n
आता या प्रोडक्शन हाऊसचे संचालक सूरज बडजात्या आहेत. राजकुमार बडजात्या यांनी प्रोडक्शन हाऊस राजश्री ची सुरूवात 1947 सालादरम्यान त्यांचे वडील ताराचंद बडजात्या यांच्यासोबत केली होती. राजकुमार बडजात्यांनी सह-निर्माता म्हणूनही अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांनी 1960-1980 सालापर्यंत अनेक चित्रपटांसाठी सह-निर्मात्याची भूमिका पार पाडली. राजकुमार बडजात्या यांच्याद्वारे प्रोड्यूस करण्यात आलेली शेवटची रोमँटीक कॉमेडी ड्रामा फिल्म ‘हम चार’ होती. त्यांच्या नेतृत्वात बनलेल्या अनेक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअरनेही सन्मानित करण्यात आलं होतं.

राजकुमार बडजात्या यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे आणि अनेक बॉलीवूड सेलेब्सनी याबाबत ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. 

 

21 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT