ADVERTISEMENT
home / बिग बॉस
सई लोकुर अडकली विवाहबंधनात, सोहळ्याचे अप्रतिम फोटो झाले व्हायरल

सई लोकुर अडकली विवाहबंधनात, सोहळ्याचे अप्रतिम फोटो झाले व्हायरल

‘बिग बॉस’ मराठीचा पहिला सीझन इतका गाजला की यामधील स्पर्धकांना विसरणं अजूनही शक्य नाही. त्यातही सर्वात जास्त टफ फाईट प्रत्येकाला दिली होती अशी स्पर्धक म्हणजे सई लोकुर. कोणताही टास्क असो तो पूर्ण केल्याशिवाय सई कधीही मागे हटली नाही आणि त्यामुळेच सई कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.काही दिवसांपूर्वीच सईने तीर्थदीप रॉय याच्याशी साखरपुडा केला होता. आता सोमवारी (30 नोव्हेंबर) सई दीपसह लग्नबंधनात अडकली आहे. सई आणि दीपचे फोटो व्हायरल होत आहेत. सईच्या लग्नाचे विधी तीन दिवस चालू होते. तर सईच्या लग्नात तिची जवळची मैत्रीण मेघा धाडेदेखील होती. मात्र पुष्कर जोगची अनुपस्थिती जाणवली. सईच्या चाहत्यांसाठी हे खास फोटो.

रूबिनाचा अभिनवसह नात्याबद्दल खुलासा, नोव्हेंबरमध्ये घेणार होती घटस्फोट

नऊवारी साडीमध्ये सईचे खुलले सौंदर्य

तीर्थदीप रॉय बंगाली असल्याने सईचे लग्न हे दोन्ही पद्धतीने झाले.  सई लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. तर स्वतःच्या लग्नात सईने धमाल केली असल्याचे तिच्या व्हिडिओ आणि फोटोंवरून दिसून येत आहे.  सई  आणि तीर्थदीप यांचं अरेंज मॅरेज आहे असं सांगितलं तर नक्कीच पाहणाऱ्याला खोटं वाटेल. पण दोघांच्याही घरच्यांनी ठरवलेले हे लग्न आहे. इतंकच नाही तर तीर्थदीप सईला ओळखतही नव्हता आणि सई अभिनेत्री आहे याची त्याला जराही जाणीव नव्हती. मात्र सई आणि दीपला एकत्र पाहताना ही जोडी परफेक्ट आहे  असंच पाहणाऱ्याला नक्की वाटेल. लग्नाच्या वेळी सईने नऊवारी नेसली होती तर तीर्थदीप पक्का पुणेरी वेषामध्ये दिसून आला. इतकंच नाही तर सईने प्रत्येक विधीच्या वेळी तीर्थदीपचे नावही उखाण्यामध्ये घेतले. तीर्थदीपसाठी कदाचित हे सर्व नवीन असलं तरीही तोदेखील हे सर्व एन्जॉय करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. 

‘बिग बॉस’ मराठीमधील टफ फाईट देणारी अभिनेत्री प्रेमात, सोशल मीडियावर केले जाहीर

ADVERTISEMENT

सीमांत पूजन झाले बंगाली विधीने

सई आणि दीपचे लग्न हे दोन्ही  पद्धतीने झाले आहे. तिच्या लग्नातील बरेच फोटो व्हायरल होत आहे. त्यापैकी सई सीमांत पूजनाच्या वेळी बंगाली साडीमध्ये दिसून आली. पांढऱ्या आणि लाल साडीमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. सईच्या जास्त विधींना लाल आणि पांढरा असे दोन रंग दिसून आले आहेत.  तर सई आणि दीप दोघांनीही प्रत्येक विधीला कलर को – ऑर्डिनेशन करत कपडे घातले असल्याचे दिसून येत आहे.  

रोहमन शॉलने अशा प्रकारे व्यक्त केलं प्रेम, काढला सुश्मिताच्या नावाचा टॅटू

सई स्वतः व्यावसायिकदेखील आहे

सई केवळ अभिनेत्रीच नाही तर ती स्वतः इंटिरिअर डिझाईनर असून तिचे ‘सांझबायसई’ नावाचा दागिन्यांचा व्यवसायदेखील आहे. सई नेहमीच काही ना काही वेगळं करायचा प्रयत्न करत असते. तिने याच तिच्या स्वभावामुळे ‘बिग बॉस’ च्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. इतक्या सगळ्या कलाकारांमध्ये तिने आपला वेगळेपणा सिद्ध केला आणि पहिल्या पाचांमध्ये सईचं नाव होतं. सईने प्रत्येकाला टफ फाईट देत बिग बॉसमधून आपला वेगळेपणा दाखवून दिला होता. तिची अनेकांशी भांडणं झाली. मात्र एकदाही तिने माघार घेतली नाही आणि ती आपला गेम खेळत राहिली. तिने प्रत्येकाशी भिडत आपण इथे  टिकण्यासाठीच आलो आहोत हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे आजही सईचा फॅन फॉलोईंग वाढतच आहे. ‘POPxo मराठी’ कडून सई आणि दीपला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT