लाईफस्टाईल

सुरज बडजात्या अजूनही सलमानच्या प्रतिक्षेत

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Feb 28, 2019
सुरज बडजात्या अजूनही सलमानच्या प्रतिक्षेत

बॉलीवूडचा भाईजान सध्या त्याच्या ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. भारत चित्रपटाच्या शूटिंगनंतर सलमान लगेचच त्याच्या होम प्रॉडक्शनच्या ‘दबंग 3’ च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. सलमानने शूटिंगच्या या व्यस्त शेड्यूलमध्ये सुरज बडजात्याचा एक चित्रपटदेखील साईन केला आहे. सहाजिकच राजश्री प्रॉडक्शनचा हा चित्रपट एक ‘लव्हस्टोरी’ असणार आहे. सलमानने आतापर्यंत सुरज बडजात्यांच्या अनेक चित्रपटातून काम केलं आहे. खरंतर याच चित्रपटांमधून सलमानला ‘प्रेम’ ही ओळख मिळाली.  सुरज बडजात्यांच्या आगामी चित्रपटात सलमानला पुन्हा बघण्यास चाहते फारच उत्सुक आहेत. मात्र सध्या सलमानकडे सुरज बडजात्याच्या चित्रपटासाठी कोणत्याही डेट्स सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे सलमानच्या डेट फ्री होण्यासाठी सुरज बडजात्यांना आता दबंग चित्रपटाचं शूटिंग संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सलमान खानसोबत काम करण्यासाठी सुरज बडजात्यादेखील तितकेच उत्सुक आहेत.

salman and suraj 1

सुरज बडजात्यांच्या चित्रपटात पुन्हा ‘प्रेम’ची जादू

सलमान खानने सुरज बडजात्यांच्या मेैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटातून काम केलं आहे. या चित्रपटांमधून सलमान ‘प्रेम’ या नावाने प्रसिद्ध झाला. मात्र सध्या सलमान त्याच्या बिझी शेड्यूलमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला राजश्री प्रॉडक्शनला देण्यासाठी कोणतीही तारीख उपलब्ध नाही. मात्र राजश्री प्रॉडक्शनसोबत काम करण्यासाठी सलमान तयार असल्याने निर्मात्यांना तो फ्री होण्याची वाट पाहावी लागणार आहे. सलमान खानसाठी सुरज बडजात्या कितीही वेळ थांबण्यास तयार आहेत. सलमान शिवाय इतर कोणालाही ते या चित्रपटासाठी कास्ट करणार नसल्याची चर्चा आहे. हा चित्रपट नेहमीप्रमाणे ‘फॅमिली ड्रामा’ नसून तो एका वैवाहिक जोडप्यावर आधारित चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटातील प्रमुख भूमिका ही फक्त सलमान खानला समोर ठेवून ठरविण्यात आली असल्यामुळे या चित्रपटात सलमान खान असणं फारच गरजेचं आहे. त्यामुळे निर्माते सलमान खान फ्री होण्याची प्रतिक्षा करण्यास तयार झाले आहेत. सुरज बडजात्याच्या या पाचव्या चित्रपटात प्रेमची नेमकी काय भूमिका आहे हे पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

सलमानचा ‘भारत’प्रदर्शनाच्या वाटेवर

सलमान खानच्या ‘भारत’ची चर्चा सर्वत्रच सुरू आहे. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिना निमित्ताने भारत चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आलं होतं. या टीझरमधील सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली होती. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. भारतमध्ये कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, तब्बू, आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे. भारत चित्रपट देशप्रेमावर आधारित असून या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. सलमानच्या जबरदस्त संवादाने आणि एंट्रीने या टीझरमधूनच चित्रपटाची कल्पना येत आहे. पुन्हा एकदा अली अब्बास जफर, कतरिता आणि सलमान खान हे त्रिकूट या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आतापर्यंत या त्रिकूटाने केलेल सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. दमदार टीझरनंतर आता भारतच्या ट्रेलरकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सलमान आणि कतरिनाची जोडी नेहमीच हीट जोडी ठरते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सलमान आणि कतरिनाने यापूर्वी पाच चित्रपटात एकत्र काम केले असून या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  मैंने प्यार क्यू किया, पार्टनर, टायगर, टायगर जिंदा है, युवराज या पाचही चित्रपटांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं होतं. भारत हा त्या दोघांचा एकत्र काम करत असलेला सहावा चित्रपट असणार आहे. सध्या सलमान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

bharat salman

आणखी वाचाः

MeToo चळवळीवरच थांबली नाही तनुश्री दत्ता, आता दाखवणार शॉर्टफिल्म

राजकुमार रावचा ‘रुहअफ्जा’ हॉरर कॉमेडी चित्रपट

कार्तिक- क्रितीच्या ‘लिव्ह ईन रिलेशन’वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम