ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
यावर्षी ईदला प्रेक्षकांना भेटणार नाही सलमान खान, लॉकडाऊनमुळे घ्यावा लागला निर्णय

यावर्षी ईदला प्रेक्षकांना भेटणार नाही सलमान खान, लॉकडाऊनमुळे घ्यावा लागला निर्णय

कोरोना व्हायरसच्या या महामारीने सर्वच देशावर संकट आणलं आहे. पण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रावरही थांबण्याची वेळ आली आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांनाही यामुळे ब्रेक लागला आहे. स्थिती आतापर्यंत नीट झाली असती तर सलमान खान दरवर्षीप्रमाणे ईदच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना भेटला असता. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. सलमान खानचा बहुप्रतिक्षित असणारा ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं मात्र त्याचं पोस्ट प्रॉडक्शन अडकल्यामुळे आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागणार असल्याची चिन्हं आहेत. लॉकडाऊनमुळे सगळ्याच गोष्टी आता पुढे ढकलाव्या लागणार आहेत. सलमान खानच्या राधे चित्रपटाचं केवळ शेवटचं शेड्युलिंग शिल्लक होतं. पण महामारीच्या या वाढत्या प्रकोपामुळे सर्वच काम अर्धवट राहिले. चित्रपटाचं चित्रिकरणही रद्द करण्यात आले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात ‘या’ बॉलीवूड कलाकारांचे टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

राधे चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झाल्यात होते जमा

चित्रपटाबद्दल सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे राधे चित्रपटाचं चित्रिकरण पूर्णच झाल्यात जमा होतं मात्र कोरोना व्हायरसमुळे थायलंडमधील शेवटचा चित्रिकरणाचा भाग रद्द करावा लागला. त्यानंतर थायलंडमधील चित्रिकरण हे मुंबईत करण्याचे ठरवण्यात आले. हे चित्रिकरण करण्यासाठी केवळ 8 ते 10 दिवस लागणार होते. यामध्ये सलमान आणि दिशा पटानीवर एक गाणं चित्रित करण्यात येणार होते आणि चित्रपटाचे काही पॅचवर्कही बाकी होते. मार्चच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे सर्व पूर्ण झाले असते.  मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे युनिटवर सर्व स्वच्छता आणि इतर लक्ष देऊनही शेवटची 19 मार्चपासून चित्रिकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर त्यानंतर 25 मार्चपासून एकवीस दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे चित्रिकरण अर्धवट राहिले आहे. 

लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये

ADVERTISEMENT

पोस्ट – प्रॉडक्शनचे कामही अडकून पडले

तसंच पहिल्यांदी करण्यात आलेल्या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे पोस्ट – प्रॉडक्शनचे कामही सध्या अडकून पडले असल्याचे सांगण्यात आले  आहे. कारण वीएफएक्स स्टुडिओज आणि अन्य एडिटिंग ऑफिस बंद असल्याने पोस्ट प्रॉडक्शनचे काम होणे शक्य नाही. त्यामुळे आता हे सर्व लॉकडाऊन संपल्यानंतरच सुरू होऊ शकेल असेही सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अनुराग कश्यपच्या ‘बमफाड’ मधून अजून एका स्टारकिडची बॉलीवूडमध्ये एंट्री

ईदच्या मुहूर्तावर राधे प्रदर्शित होणार नाही

सलमानचा चित्रपट यावर्षी 23 मे दरम्यान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.  मात्र आता तशी शक्यता दिसून येत नाही. लॉकडाऊन संपल्यानंतरही यावर कितीही जलद काम केले तरीही या तारखेला चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे एक आव्हान असल्याचं सुत्रांकडून कळले आहे. कारण केवळ 40 दिवसात चित्रपटाचं काम पूर्ण होणं हे अशक्य आहे. त्यामुळे राधेची प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आल्याचे समजत आहे.  तसंच निर्मात्यांनी नव्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही गोष्ट ठरवली नसल्याचेही म्हटले आहे. कारण लॉकडाऊन संपून सर्व व्यवस्थित कधी होईल याबाबत कोणालाच काहीच खात्री नाही. आता सर्वांनाच वाट पाहण्याशिवाय काही दुसरा इलाज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी सूर्यवंशी आणि 83 या चित्रपटांच्या प्रदर्शनाबद्दलही सध्या काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. आधी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि त्यावर लॉकडाऊनचा काही परिणाम तर होणार नाही ना याबाबतही निर्माते सध्या  चिंतेत असलेले कळून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरच या सगळ्याबाबत चित्र स्पष्ट होईल असे दिसून येत आहे. 

लॉकडाऊनआधीच हे कपल होतं क्वारंटाइनमध्ये (क्रिती-पुलकित)

ADVERTISEMENT
06 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT