ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कतरिनानेच केले होते सलमानला ‘Reject’, सलमानने दिली कबुली

कतरिनानेच केले होते सलमानला ‘Reject’, सलमानने दिली कबुली

सल्लु भाई आणि कॅट  म्हणजेच आपल्या सलमान आणि कतरिना हो… या दोघांमध्ये काहीतरी होतं. पण काहीतरी बिनसलं. मग या दोघांमध्ये दुरावा आला. सलमानच्या इंडस्ट्रीत तशा बऱ्याच लव्हस्टोरी गाजल्या. पण कतरिनाबाबत तो अधिक पझेसीव्ह होता. पण कतरिनाने त्याला Reject केलं अशी कबुली स्वत: सलमान खानने दिली आहे. कपिल शर्मा शोमध्ये सलमानने हा खुलासा केल्यानंतर लोकांना पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसला पण नंतर हसू देखील आले.

मराठीतल्या पहिल्या वेबसिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित

सलमानने कतरिनाला केले का ‘Reject’

आता महत्वाची गोष्ट अशी की, कतरिनाने सलमानला का Reject केलं. तर कपिल शर्मा शोच्या एका सेग्मेंटमध्ये कतरिनाला तिच्या काही जुन्या आठवणींबद्दल विचारण्यात आले. कपिलने तिला दे दना दन शूटच्या वेळीचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, कतरिना त्या चित्रपटासाठी इतके स्ट्रिक्ट डाएट करत होती की, तिने त्यावेळी स्मुदीला देखील नकार दिला होता. ते बोलतानाच सलमान कपिलला अडवत म्हणाला की, तू स्मुदीला नकार दिल्याचे सांगतोयस तिने तर मला Reject  केलं आहे. यावर एकच हशा पिकला. त्यामुळे भाईने आपल्या मनातील Rejection ची गोष्ट सगळ्यांमोर बोलून दाखवली आहे. असे म्हणायला हवे.

‘थप्पड से डर नही लगता साहब प्यास से लगता है’

salman katrina kapil sharma

ADVERTISEMENT

सलमान आणि कतरिना सध्या त्यांच्या भारत या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनसाठी ही दोघं कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती. त्यावेळी कतरिनाला जेव्हा प्रेमासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली.. मुझे प्यार से डर लगता है असे उत्तर दिले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिनाचे कोणासोबतही सूत जुळले नाही किंवा तिने जुळू दिले नाही. भारत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाला एकत्र पाहून अनेकांना आनंद झाला आहे हे नक्की!

सलमान कधी करणार लग्न?

इतर मुलींप्रमाणे सलमानला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सलमान लग्न कधी करणार?? हा प्रश्न जेव्हा कतरिनाला विचारण्यात आला तेव्हा कतरिना स्मित करत म्हणाली की, सलमानचे लग्न कधी होईल हे फक्त दोनच लोक सांगू शकतात. एक साक्षात परमेश्वरआणि दुसरा सलमान…

‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या नावावरुन कंगनाने सुरु केला नवा वाद

कपिलच्या शो मध्ये केली धमाल

एकूणच काय सलमान आणि कतरिनाने कपिलच्या शोमध्ये अशी काय धमाल केली आहे की, हा एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहायला हवा. तरच तुम्हाला या शोमध्ये नक्की काय झालं ते कळेल. पण सध्या तरी सोशल मीडियावर या शो चा टीझर व्हायरल होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

अभिनय सांभाळून रिंकूला बारावीत मिळाले सैराट यश

5 जूनला चित्रपट येतोय भेटीला

salman katrina

रमजान ईदच्या मुर्हूतावर सलमानचा ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या आधी हे दोघेही अनेक ठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे.त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले असून सगळीकडेच या दोघांच्या नात्यामधील वेगळेपणा टिपण्यात आला आहे. सलमान या चित्रपटात कतरिनाने केलेल्या कामाचे इतके प्रमोशन करत आहे की, त्याने कतरिनाला तिच्या या रोलसाठी पुरस्कार मिळेल अशी घोषणाही करुन टाकली आहे.

(सौजन्य- Instagram)

ADVERTISEMENT
28 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT