हम आपके है कौन चित्रपट फारच लोकप्रिय झाला होता. अनेकांना या चित्रपटातील गाणी, कथा, कलाकार प्रचंड आवडले होते. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. कारण सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेला हम आपके है कौन चित्रपटाला तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिबर्टी सिनेमागृहात या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. हे स्क्रिनिंग 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलं आहे. कारण 5 ऑगस्ट 1994 रोजी लिपर्टीमध्येच या चित्रपटाचं प्रिमियर शो प्रदर्शित करण्यात आला होता विशेष म्हणजे या स्किनिंगसाठी या चित्रपटाचे सर्व कलाकार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याची शक्यता आहे. कलकार त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आणि काही मजेदार किस्से या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत.
हम आपके है कौनची जादू
हम आपके है कौन चित्रपटाने एके काळी सर्व चाहत्यांवर मोहिनीच घातली होती. 1994 साली सुरज बडजात्यांची निर्मिती असलेला हा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आजही लोकप्रिय आणि बिग बजेट चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना केली जाते. या चित्रपटामध्ये रेणूका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागु, मोहनिश बहल, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे असे दिग्गज कलाकार होते. चित्रपटात कलाकारांनी घातलेल्या कपड्यांची फॅशन त्यावेळी ट्रेंडमध्ये होती. या चितपटाला अनेक पूरस्कार मिळाले होते. राजश्री प्रॉडक्शनचा हा चित्रपट 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘नदिया के पार’ या चित्रपटाचं मॉर्डन व्हर्जन असल्याचं म्हटलं जातं. हम आपके है कौनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने पंचविस वर्षांपूर्वी जवळजवळ 100 कोटीची कमाई केली होती. एवढंच नाही तर 1096 सालापर्यंत या चित्रपटाची सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये गणना केली जात होती.
सलमान आणि माधुरीची केमिस्ट्री
सलमान खान आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री या चित्रपटातून पाहता आली होती. या चित्रपटात त्यांनी प्रेम आणि निशाची भूमिका साकारली होती. प्रेम आणि निशाची ही अवखळ प्रेमकथा सर्वांनाच आवडली होती. शिवाय हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट लोकांनी पाहिला होता. इतकी वर्षे लोटून देखील या चित्रपटाची भुरळ आजही कमी झालेली नाही. हा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी आजही लोक आवडीने पाहतात. हम आपके है कौन, दिदी तेरा देवर दिवाना, मौैसम का जादू है मितवा , मुझसे जुदा होकर, धिकताना धिकताना अशी एकूण चौदा गाणी या चित्रपटात होती. आश्चर्य म्हणजे या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली होती. या चित्रपटाला बॉलीवूडच्या इतिहासात मानाचं स्थान आहे. शिवाय आता या चित्रपटाला पंचविस वर्षे पूर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणींचा मागोवा घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
अधिक वाचा
शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक
Indian Idolचे हे विजेते सध्या काय करत आहेत, जाणून घ्या
15 ऑगस्टसाठी खास शुभेच्छा संदेश
फोटोसौजन्य – इ्न्टाग्राम