ADVERTISEMENT
home / मनोरंजन
salman khan take off shoes

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सलमानने असे केले अभिवादन, व्हिडिओ व्हायरल

 संबंध महाराष्ट्र आणि देशापार ज्यांची ख्याती आहे ते आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. शेंबड्या पोरापासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच त्यांचे नाव आणि किर्ती परिचित आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे नाव अपुरेच आहे. अशा महाराजांना वंदन करायची वेळ येते. त्यावेळी ते एका दैवतासमानच असते. असेच काहीसे सलमान खानच्या बाबतीत झाले आहे. एका कार्यक्रमाच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पाय पडण्यासाठी त्याने जे केले त्यामुळे त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला नेमकं काय झालं ते आज आपण जाणून घेऊया

 अन् त्याने पायातील बूट काढले

ठाण्याचे शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आनंद दिघे यांच्यावर आधारीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक जण उपस्थित होते. अनेक दिग्गज मंडळींमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि सलमान खान यांचा देखील समावेश होता. शिवसेनेचा नेता आणि बाळासाहेब ठाकरे, मॉसाहेबांवर प्रेम नसणार असे अजिबात होणार नाही. त्यासोबत महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांची देखील प्रतिमा होती. कोणत्याही प्रतिमेची पूजा करताना आपण पायताण काढून ठेवतो. सलमान खान इतक्या मोठ्या कार्यक्रमात असे काही करेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण त्याने लगेचच आपल्या पायातील बूट काढले आणि मगच तो पाया पडला. महाराज आणि अनेकांचे आदर्श असलेल्या बाळासाहेबांना असे अभिवादन केल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सलमानचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 

सलमानची झाली प्रशंसा 

ट्रेलर लाँच दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे सलमानची प्रशंसा अधिकाधिक होताना दिसत आहे. एरव्ही सलमान अगदी क्षुल्लक कारणांमुळेही ट्रोल होत असतो. पण त्याच्या या अशा वागण्यामुळे त्याच्यावर प्रशंसेचा पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे सलमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ईद जोरदार केली साजरी

 नुकतीच सगळ्या जगात रमजान ईद साजरी करण्यात आली आहे. सलमानच्या घरी साजरी होणारी ईद ही अधिक चर्चेचा विषय असते. कारण अनेक सेलिब्रिटी त्याच्याकडे दावतसाठी येत असतात. यंदाही सलमानची ईद दणक्यात साजरी झाली. ईदच्या दरम्यान त्याचा चित्रपटही येत असतो.  पण यंदा त्याच्या चित्रपटाची कोणतीही चर्चा होताना दिसली नाही. त्याचा चित्रपट सध्या कोणताही नाही असेच दिसत आहे. त्याला बघण्यासाठी अनेक जण बिग बॉसची वाट पाहात असतात. आता त्याला पुन्हा एकदा स्क्रिनवर पाहण्यासाठी बिग बॉस येण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान, सलमानचे हे वागणे तुम्हाला कसे वाटले? नक्की कळवा.

10 May 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT