यशराज फिल्म्सच्या बंटी और बबली या चित्रपटाने 2005 मध्ये बॉलीवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता यशराज फिल्मने पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सीक्वलचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात राणी मुर्खर्जी आणि सैफ अली खान ही जोडी असणार आहे. राणी आणि सैफची जोडी यापूर्वीही हिट झालेली आहे. त्यामुळे जवळजवळ पंधरा वर्षांनी ते दोघं पुन्हा एकत्र काम करत आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट चांगलाच रखडला असला तरी आता लवकरच म्हणजे 23 मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. ट्रेलर प्रदर्शित करण्याबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर नियोजनबद्ध प्रदर्शित केला जाणार आहे. शिवाय ते लाईव्ह लॉंच केलं जाणमार असून त्यासाठी यशराज फिल्सने सलमान खानची निवड केली आहे.
सलमानच्या हस्ते होणार ट्रेलर लॉंच
सध्या तरी 23 मार्चला सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित केलं जाणार अशीच चर्चा आहे. शिवाय हे लाईव्ह प्रदर्शन असून यासाठी यशराज फिल्मने एक थिएट्रिकल प्रोमो तयार केला आहे. कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन दाखवण्यात येणार असला तरी त्यासाठी खास नियोजन मात्र जोरदार करण्यात आलं आहे. खरंतर या कार्यक्रमाला ग्रॅंड इव्हेटचं स्वरूप देण्याची इच्छा यशराज फिल्म्सची होती. मात्र कोरोनाबाधित लोकांच्या वाढत्या संख्येमुळे नियोजनामध्ये नंतर काही बदल करण्यात आले. सलमान खानही हे ट्रेलर डिजिटलीच लॉंच करणार आहे. सलमानने हे ट्रेलर प्रदर्शित करावं अशी खास निर्माता अदित्य चोप्राची इच्छा आहे. सगळं काही सुरळीत असेल तर प्रेक्षकांना 23 मार्चला बंटी और बबली 2 चं ट्रेलर नक्कीच पाहायला मिळू शकेल.
बारा वर्षांनी सैफ आणि राणी दिसणार एकत्र
बंटी और बबली 2 च्या ट्रेलरसाठी करण्यात आलेलं हे नियोजन पाहता हा चित्रपट या वर्षीचा एक धमाल चित्रपट असू शकतो. या चित्रपटातून जवळजवळ बारा वर्षांनी प्रेक्षकांना सैफ आणि राणीची जोडी पाहायला मिळणार आहे. सैफ आणि राणीची जोडी म्हणजे एकेकाळी ‘हमतुम’ जोडी समजली जायची. कारण त्यांच्या ‘हमतुम’ चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 2008 मध्ये ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर राणी आणि सैफ कोणत्याच चित्रपटात एकत्र दिसले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही ‘हमतुम’ जोडी ‘बंटी और बबली’मधून पाहता येणार आहे. हा चित्रपट राणी आणि सैफच्या भूमिकेभोवती फिरणारा असेल. या सीक्वलमध्ये बंटी आणि बबली ही चोर जोडी सज्जन झालेली दाखवण्यात येणार आहे. मात्र दुसरंच एक तरूण जोडपं बंटी और बबली या प्रसिद्ध नावाचा वापर करत चोऱ्या करू लागतं. ज्यामुळे खरी बंटी और बबलीची जोडी निर्दोष असून आणि सत्कर्याच्या मार्गाला लागूनही चोरीच्या गुन्हात फसली जाते. त्यानंतर पुढे काय होतं हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
दीया और बाती हम फेम कनिका महेश्वरीने ’17’ किलो वजन केलं कमी
असं आहे दीपिका पादुकोणचे डेली रूटीन, शेअर केला व्हिडिओ
बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी निर्मितीच्या क्षेत्रातही घेतली उत्तुंग भरारी