बॉलीवूडमध्ये खान त्रयींचं राज्य आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच नाही. गेल्या २५ वर्षांपासून सलमान, शाहरूख आणि आमिर यांनी बॉलीवूडमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. तिघांमध्येही चांगली मैत्री असल्याचंही वेळोवेळी दिसून आलं आहे. मध्यंतरी सलमान आणि शाहरूखमध्ये दुरावा आल्यानंतर पुन्हा एकदा अर्पिताच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांच्यातील असलेला दुरावा पुन्हा एकदा दूर झाला आणि पुन्हा ही त्रयी एकत्र दिसू लागली. असं असलं तरीही आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये मात्र हे तिघं कधीही एकत्र दिसलेले नाहीत. प्रेक्षकांनाही या तिघांना एकत्र पाहण्याची इच्छा आहे. मात्र जे बॉलीवूडमधील चित्रपट करू शकले नाहीत ते ईशा आणि आनंदच्या प्रि – वेडिंगमध्ये शक्य झालं आहे. सलमान – शाहरूख आणि आमिर एकाच वेळी स्टेजवर दिसले आहेत.
शाहरुख आणि गौरीच्या डान्समध्ये आमिरची एन्ट्री
सध्या ईशा आणि आनंदच्या प्रि – वेडिंग सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये शाहरूख आणि गौरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांच्या डान्सदरम्यान लाल शेरवानीमधील आमिरही डान्स करायला आलेला दिसत आहे. २५ वर्षांच्या मुलालाही लाजवतील अशा एनर्जीने दोघेही डान्स करताना दिसत आहेत. ईशा आणि आनंदच्या लग्नाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शाहरूख आणि आमिरने स्टेज शेअर केलं असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत आमिर आणि सलमान बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसले आहेत. मात्र शाहरूख आणि आमिर पहिल्यांदाच असे स्टेजवर एकत्र दिसले.
ईशा आणि अनंतच्या मागे नाचला सलमान
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अनंत आणि ईशाच्या मागे बॅकग्राऊंड डान्सरप्रमाणे सलमान नाचताना दिसत आहे. मात्र यावेळी सलमान घरच्या कार्यक्रमाप्रमाणेच आनंदी होऊन नाचताना दिसत आहे. शाहरूखच्या ‘कुछ कुछ होता है’ मधील ‘कोई मिल गया’ गाण्यावर सलमान ईशा आणि अनंतबरोबर नाचतानाचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ईशा आणि आनंदचा प्रि – वेडिंग सोहळा हा एखाद्या पुरस्कार सोहळ्यापेक्षा नक्कीच कमी नाही. बॉलीवूडमधील जवळजवळ सर्व स्टार्स ईशा आणि आनंदला शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सहभागी झाले आहेत. महिनाभर दीपिका – रणवीर आणि प्रियांका – निकच्या लग्नाच्या फोटोज आणि व्हिडिओजनंतर आता आठवडाभर ईशा आणि आनंदच्या प्रि – वेडिंगचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, इतर दोन लग्नांप्रमाणे या लग्नाच्या फोटोज आणि व्हिडिओसाठी चाहत्यांना वाट पाहायला लागली नाही.
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – Viral Bhayani, weddingsutra, Instagram