ADVERTISEMENT
home / सौंदर्य
१ मे पासून पार्लर होणार महाग

आताच जाऊन घ्या पार्लर सर्व्हिस, 1 मे पासून होणार दरवाढ

 महिन्यातून एकदा तरी आपल्या महिलांना पार्लरला जावेच लागते. अगदी आयब्रोज का असेना सगळ्याच महिला कधी ना कधी पार्लरमध्ये जातोच. पण आता जर तुमचं पार्लरमध्ये जाणे राहून गेले असेल तर तुम्ही आताच लगबगीने जाऊन या कारण येत्या 1 मे पासून पार्लरमध्ये दरवाढ होणार आहे. लॉकडाऊननंतर बुडालेल्या पार्लर व्यवसायाला उभारी आणण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे कळत आहे. दरम्यान, या दरवाढीचा परिणाम नेमका कोणकोणत्या सर्व्हिसवर होणार आहे ते सगळ्यांनीच जाणून घेणे गरजेचे असणार आहे. चला जाणून घेऊया याबद्दलची माहिती

या कारणासाठी केली जाणार आहे दरवाढ

 गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाने अनेक व्यवसाय ठप्प झाले. आता कुठे सगळे व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरु होऊ लागले आहेत. या मधल्या काळात झालेले नुकसान, शाळेच्या वाढलेल्या फी, पेट्रोल- डिझेलचे वाढते भाव आणि अन्य महागाई पाहता पार्लर असोशिएशनकडून महागाईवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 30 टक्के इतकी भाववाढ केली जाणार आहेत. आधीच अनेक बड्या पार्लरमध्ये जीएसटी आणि अन्य कर घेऊन महाग अशा ट्रिटमेंट दिल्या जातात. त्यात भर की काय 30 टक्के दर वाढल्यामुळे लोकांची नाकं मुरडणार आहेत. इतके नक्की!  1मे पासून ही भाववाढ लागू केली जाणार आहे.

काय काय होईल महाग

अद्याप कोणत्या कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत. या बद्दल काही खास माहिती देण्यात आलेली नाही. पण एकूणच 30 टक्के वाढ पाहता लोक याला कसा प्रतिसाद देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण आधीच महागाईने डोकं वर काढलेले असताना सुंदर दिसण्यासाठी मदत करणारे ठिकाणही महाग झाल्यामुळे लोकांचा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता आहे. ही भीती पार्लर असोशिएशनला देखील आहे. 

पुरुषांनाही फटका

पुरुषांसाठी दाढी आणि केस कापणे हे अगदी महत्वाचे आणि आठवड्याला करण्यासारखे काम आहे. आता त्यांनाही या कामासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. यात काही शंका नाही. सध्याच्या घडीला 150 रुपयांपासून केसांचा हेअरकट करता येतो. त्यात वाढ झाल्यामुळे पुरुषांनाही केस कापणे, दाढी करणे याचा विचार करावा लागणार आहे. खरंतरं महिलांपेक्षा अधिक फटका हा पुरुषांना होणार आहे.

ADVERTISEMENT

महागाई वाढ की चांगली सर्व्हिस

दरवाढ ही थोडी थोडकी नाही तर तब्बल 30 टक्के आहे. आता यामध्ये चांगल्या सोयी सुविधा किंवा अन्य काही सलोन किंवा पार्लरकडू मिळेल का असा प्रश्न देखील लोकांना पडला आहे. काही दिवस या भाववाढीशी जुळवून घेणे शक्य होणार नाही. पण त्यानंतर तरी ही दरवाढ पटते का? हे पाहावे लागेल. 

या नव्या दरवाढीविषयी तुम्हाला काय वाटते? आम्हाला नक्की कळवा

22 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT