ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
समंथा रूथ प्रभूने केले सान्या मल्होत्राच्या डान्सचे कौतुक

समंथा रूथ प्रभूने केले सान्या मल्होत्राच्या डान्सचे कौतुक

सगळीकडे सध्या चर्चेत असणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुनचा “पुष्पा” हा चित्रपट आणि त्यातील गाणी होत. सोशल मीडियावर तर जो तो ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामी सामी’ ह्या गाण्यांवर आपापला डान्स परफॉर्मन्स दाखवतोय.   ह्यात बॉलिवूड स्टार्स देखील मागे नाहीत. बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने नुकतेच पुष्पा मधील प्रसिद्ध गाणे ‘ओ अंटावा’ वर डान्स परफॉर्मन्स  करून तिच्या चाहत्यांकडून वाहवा मिळवली आहे. तिने तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या ह्या डान्समध्ये तिने स्वतःचा एक ट्विस्ट दिला आहे. ज्यामुळे तिने दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभूचे लक्ष वेधून घेतले आहे.  

समंथाने दिली मनमोकळी दाद 

विशेष म्हणजे पुष्पा चित्रपटामध्ये समंथा रूथ प्रभूवरच हे गाणे चित्रित झाले आहे.  सान्याच्या या  डान्स परफॉर्मन्सला समंथाने मनमोकळी दाद दिली आहे. तिने सान्याचा व्हिडीओ स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत सान्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. सान्याचा डान्स म्हणजे “उफ्फ ..सो हॉट” अशी प्रतिक्रिया समंथाने दिली आहे.  

‘ओ अंटावा’ ह्या गाण्याला आजवर युट्युबवर १० कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर देखील सध्या हेच गाणे ट्रेंडिंग आहे. हे गाणे समंथाच्या चित्रपट कारकिर्दीतील पहिलेच आयटम सॉंग आहे. पहिलेच आयटम सॉंग इतके हिट झाल्यामुळे समंथाचे सगळीकडे कौतुक होत आहे. एक अभिनेत्री म्हणून समंथा रूथ प्रभूने आजवर अनेक चांगले चित्रपट दिलेले आहेत. तिच्या अभिनयाचे सगळीकडेच कौतुक होते. मागच्या वर्षी आलेल्या “फॅमिली मॅन टू’ ह्या वेबसिरीज मधला तिचा अभिनय तर विशेष लक्षवेधी होता. तिने रंगवलेले “राजी” हे पात्र सगळ्यांच्या विशेष लक्षात राहिले. फॅमिली मॅन मधील राजी हीच ‘ओ अंटावा’’ मधील समंथा आहे  ह्यावर आपला विश्वास बसणार नाही इतका तिच्या ह्या दोन्ही रूपांत फरक आहे. 

सान्याच्या डान्सचा व्हिडीओ येथे बघा

ADVERTISEMENT

सेक्सी दिसणे माझ्यासाठी एक टास्क होते -समंथा 

पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समांथाने तिच्या आयटम नंबरसाठी  “सेक्सी दिसणे”  हे तिच्यासाठी कसे मोठे टास्क  होते याबद्दल सांगितले. “मी नायिका रंगवली, मी खलनायिका सुद्धा रंगवली, मी मजेदार, कॉमेडी भूमिका केल्या,  मी गंभीर भूमिकाही केल्या,  मी चॅट शोचे निवेदन करण्याचा अनुभव देखील घेतला. मी जे काही हाती घेते त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मी खरोखरच कठोर परिश्रम घेते जेणे करून माझी भूमिका योग्य वठवली जाईल. पण सेक्सी असणे आणि दिसणे हे फारच कठीण काम आहे, ओह!” असे तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले. समंथाने चाहत्यांनी तिला दिलेल्या अफाट प्रेमासाठी त्यांचे आभारही मानले. 

आयुष्यात प्रेमाचे रंग उधळणार ‘मेरी गो राऊंड’

ओटीटी सह चित्रपटगृहांत देखील गाजतोय पुष्पा  

सोमवारी प्रसिद्ध व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी जाहीर केले की पुष्पाची हिंदी आवृत्ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा धुमाकूळ घालतेय. साधारणपणे एखादा चित्रपट जेव्हा ओटीटीवर प्रदर्शित होतो तेव्हा त्याचा चित्रपटगृहांतील व्यवसाय कमी होतो असे दिसून येते. पण पुष्पाने मात्र ह्याविरुद्ध दोन्हीही ठिकाणी उत्तम व्यवसाय करीत वरिल मिथक मोडीत काढले आहे. मैं झुकेगा नहीं” म्हणत ‘पुष्पाभाऊ’ सगळीकडेच चाहत्यांचे मनोरंजन करतोय. अल्लू अर्जुनने मागच्या आठवड्यात पुष्पाच्या यशाचा आनंद साजरा केला. पुष्पा मधील“श्रीवल्ली” ह्या गाण्याचा गायक  सिड श्रीरामची अल्लू अर्जुनने मनापासून स्तुती केली.  

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

एस एस राजमौलीचा ‘आरआरआर’ आता या तारखेला होणार प्रदर्शित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

The Great Glamm Survey

01 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT