ADVERTISEMENT
home / मनोरंजन
shaakuntalam first look

समंथा रुथ प्रभूने शेअर केला ‘शाकुंतलम’ मधील तिचा पहिला लूक, चाहत्यांनी केले कौतुक

‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम साँगच्या चर्चेनंतर आता समंथा रूथ प्रभू तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ चित्रपटासाठी चर्चेत आहे, ज्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.समंथा रुथ प्रभूने सोमवारी तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकले. पोस्टरमध्ये, ती पांढर्‍या पोशाखात, फुलांच्या दागिन्यांसह एका राजकन्येसारखी दिसते आहे. पोस्टरमध्ये समंथा एका जंगलाच्या मध्यभागी तिच्या सभोवतालच्या जंगली प्राण्यांसोबत बसलेली दिसत आहे. पोस्टर शेअर करताना तिने लिहिले, “सादर करत आहे…निसर्गाचा लाडका…दिव्य आणि संयमी… #शाकुंतलम #शाकुंतलमफर्स्टलूक #शकुंतला”. तिने या चित्रपटातील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चाहते उत्साहित झाले व त्यांनी लगेच प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले.

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव 

पोस्टरमध्ये समंथा किती सुंदर दिसतेय  हे पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत. पौराणिक कथांमध्ये त्यांनी वाचलेल्या शकुंतलेच्या सौंदर्याचे समंथा हे उत्तम उदाहरण आहे असे त्यांना वाटते आहे. तिच्या चाहत्यांपैकी एकाने लिहिले की,  “सॅम मॅम आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.”  तर दुस-याने लिहिले की “येsssss! हा चित्रपट आमच्यासाठी खूप खास आहे, हो ना दीदी!” तिसऱ्याने चाहत्याने लिहिले की, “ओह माय गॉड!  तू खूप स्वप्नवत दिसत आहेस आणि तरीही खूप स्ट्रॉंग आहेस. तर चौथा फॅन लिहितो की, “केवळ दैवी आणि तरीही अवास्तव नाही.”

अधिक वाचा – Dadasaheb Phalke Awards 2022 : रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

समंथा दिसतेय अप्सरेसारखी 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत असला तरी त्याचा तिच्या कामावर तिने कुठलाही परिणाम करून घेतलेला नाही. ती तिच्या व्यावसायिक आघाडीवर खूप सक्रिय आहे. अलीकडेच, चित्रपटातील एक पोस्ट शेअर करताना, तिने खुलासा केला होता की तिचा चित्रपटातील पहिला लूक लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता स्वत: समांथाने तिचा फर्स्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर  केला आहे. या फोटोमध्ये समंथा जंगलातील झाडे, उंदीर, हरणे, मोर आणि फुलपाखरे यांच्यामध्ये बसलेली दिसते आहे. कुरळे केस, हात आणि पायांना गुलाबाच्या फुलांच्या माळा गुंडाळलेल्या आणि पांढरी साडी नेसलेली समंथा आकाशातून अवतरलेल्या अप्सरेसारखी दिसतेय. पोस्टरमधला तिचा लूक पाहून जणू ती वनातली राजकन्याच आहे असे भासते आहे. 

ADVERTISEMENT

 अधिक वाचाछत्रपती महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान गायले गायक दिव्य कुमारने

लगेच व्हायरल झाला फोटो 

चाहत्यांना समंथाची ही स्टाईल खूप आवडली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या फोटोला 5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. समंथा या चित्रपटात शकुंतलेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट शंकुतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. 

या चित्रपटात अभिनेता देव मोहन हा दुष्यंत राजाची भूमिका करणार आहे. तसेच गौतमी, अनन्या नागल्ला, सचिन खेडेकर, वर्षानी सुंदरराजन, मोहन बाबू आणि आदिती बालन हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे आणि नीलिमा गुणा आणि दिल राजू यांनी अनुक्रमे गुन्ना टीमवर्क्स आणि दिल राजू प्रॉडक्शन या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

ADVERTISEMENT

हा चित्रपट कालिदासाच्या शाकुंतलम या लोकप्रिय नाटकावर आधारित आहे.  शकुंतला ही राजा दुष्यंतची पत्नी आणि सम्राट भरताची आई होती. राजा दुष्यंत जंगलात शिकारीच्या प्रवासाला निघाला असताना शकुंतलेला भेटतो. ते प्रेमात पडतात आणि  गांधर्वविवाह करतात. असे काहीसे हे कथानक आहे. 

याशिवाय समंथा रुथ प्रभूचा लवकरच आणखी एक चित्रपट येतोय. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. ‘कथू वकुला रेंदू कादळ’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात समंथा रुथ प्रभु बरोबर विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Photo Credit- Samantha Ruth Prabhu Instagram profile

अधिक वाचा – ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

21 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT