साऊथ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूच्या यशोदा रिलीज डेट पोस्टपोर्न झाली आहे. हा चित्रपट 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र आता निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोर्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं मुख्य कारण अक्षय कुमार आणि आमिर खानचे चित्रपट आहेत. कारण 11 ऑगस्टला आमिरचा लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होत आहे तर त्याच काळात अक्षय कुमारचा रक्षाबंधनही चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे. सहाजिकच याच कारणामुळे यशोदाच्या निर्मात्यांनी हा मोठा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
यशोदा पोस्टपोर्न होण्यामागचं कारण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदाच्या निर्मात्यांना चित्रपट आता अशा काळात प्रदर्शित करायचा आहे. जेव्हा चित्रपटासाठी जास्त स्पर्धा नसेल. यशोदा जर 12 ऑगस्टला प्रदर्शित केला तर या चित्रपटाला अक्षय आणि आमिरच्या चित्रपटांना टक्कर द्यावी लागेल. आमिरच्या लाल सिंह चड्ढाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. शिवाय अक्षय कुमारचे चित्रपटही तुफान चालतात. त्यामुळे आता यशोदा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलणं हाच निर्मात्यांसमोर शहाणपणाचा मार्ग असेल. वास्तविक एक गाणं सोडून चित्रपटाचं सर्व शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी शंभर दिवस लागले आहेत. उरलेलं एक गाणं कधीही शूट केलं जाऊ शकतं. पोस्ट प्रॉडक्शन आणि डबिंगचं काम पंधरा दिवसांमध्ये उरकण्यात येण्यासारखं आहे. त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यामागे इतर दुसरं कोणतंही कारण नसून फक्त अक्षय आणि आमिरच्या चित्रपटांचं कारण आहे. रक्षाबंधन आणि लाल सिंह चड्ढा यशोदाच्या यशात आडवे येऊ नयेत यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.
काय आहे यशोदाचे कथानक
यशोदा चित्रपटात सामंथा रूथ प्रभू मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे कथानक एका महिला कैदीच्या संघर्षाभोवती फिरत आहे. हा चित्रपट मुळचा तेलुगू भाषेतला असून, तो तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हरि आणि हरिश यांनी केलं आहे. या चित्रपटात सरथकुमार, राव रमेश, उन्नी मुकुंदन, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा, प्रियंका शर्मा, कल्पेश गणेश मुख्य भूमिकेत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक