ADVERTISEMENT
home / Recipes
घरच्या घरी बनवा चविष्ट सांभार, येईल हॉटेलसारखा स्वाद (Sambhar Recipe In Marathi)

घरच्या घरी बनवा चविष्ट सांभार, येईल हॉटेलसारखा स्वाद (Sambhar Recipe In Marathi)

महाराष्ट्रीयन असो वा पंजाबी असो अथवा कोणीही असो त्याला इडली सांभार, मेदूवडा सांभार हे पदार्थ माहीत नाहीत असं होणारच नाही. दाक्षिणात्य पदार्थांमध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सांभार. चविष्ट सांभाराचे नुसतं नाव जरी काढलं तरीही तोंडाला पाणी सुटतं. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की, शेट्टी अथवा दाक्षिणात्य हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे सांभार बनविण्यात येतं तसं सांभार घरी बनवता येत नाही. पण असं अजिबात नाही. तुम्ही घरच्या घरीही आता चविष्ट सांभार बनवू शकता. तुम्ही घरी तयार केलेल्या सांभारालाही हॉटेलसारखा स्वाद येऊ शकतो. साधी आणि सोपी रेसिपी आम्ही खास तुमच्यासाठी मराठीत घेऊन आलो आहोत. सांभार रेसिपी मराठीत (Sambhar Recipe in Marathi) तुम्ही जाणून घेऊ शकता. असं अजिबात नाही की, केवळ दाक्षिणात्य लोकच सांभार करू शकतात. ही रेसिपी वापरून तुम्हीही तुमच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी चविष्ट सांभार बनवा आणि आम्हाला नक्की सांगा की, तुम्हाला ही रेसिपी उपयोगी पडली की नाही. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पारंपरिक सांभार मसाला घरच्या घरी बनवा. या लेखातून सांभार मसाला (sambhar masala recipe in marathi) आणि सांभार या दोन्हीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

घरच्या घरी बनवा मऊ लुसलुशीत इडलीचे वेगवेगळे प्रकार (Idli Recipe In Marathi)

सांभार मसाला बनविण्यासाठी साहित्य आणि कृती

  • अर्धा चमचा मेथी दाणे
  • 1 उडीद डाळ
  • 1 चमचा चणाडाळ
  • 6 ते 7 सुक्या मिरच्या
  • 2 चमचे धणे
  • 1/2 कप ताजा खोवलेला नारळ
  • 15-20 पाने कढीपत्ता पाने

कृती:

  • मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे मंद आचेवर गुलाबीसर भाजावी.
  • त्याचा साधारण रंग बदलला की त्यानंतर सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनिट्स परतावे.
  • गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  • यामध्ये तुम्ही धणेपूड वापरली तरीही चालेल, फक्त किंचित परतून घ्यावी.
  • तुमचा सांभार मसाला घरच्या घरी तयार. हा मसाला तयार झाल्यावर आता पाहूया सांभार करण्याची पद्धत

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

ADVERTISEMENT

सांभार तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

  • 1 वाटी तुरीची डाळ
  • 3-4 चमचे तेल
  • 1 चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी
  • 1 चमचा हिंग
  • 1 छोटा चमचा हळद
  • 1 चमचा सांबार मसाला
  • 1 चमचा तिखट
  • गूळ
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा चिंचेची पेस्ट
  • कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला
  • 2 वांगी चिरून
  • शेवग्याच्या शेंगा (तुमच्या आवडीनुसार)
  • 2 फोडी लाल भोपळा चिरून
  • कढीपत्ता
  • लसणाची पेस्ट (लसूण ठेचून घातली तर स्वाद अधिक चांगला येतो. हे तुमच्या आवडीनुसार ठरवावे)

कृतीः 

  • पहिल्यांदा सर्व भाज्या चिरून घ्याव्या. कांदा आणि टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत. कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेणे
  • मोठ्या पातेल्यात तेल घालून जिरे आणि मोहरीची फोडणी करावी. यातच कढीपत्ता, लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर यामध्ये टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, शेवग्याच्या शेंगा आणि चिरलेली वांगी घालावी. चिंचेचा कोळ, हिंग, हळद, सांभार मसाला, तिखट व गूळ घालून झाकण ठेऊन भाज्या 5 मिनिटे वाफवून घ्याव्यात. व्यवस्थित शिजल्या की नाही ते पाहावे
  • शिजलेल्या भाज्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घोटून पाणी टाकून पातळ करून घालावी. नंतर हे सांबार चवीनुसार मीठ घालून 10 मिनीट्स गॅसवर ऊकळत ठेवावे
  • यानंतर तुमचे सांभार तयार आहे. इडली, मेदूवडा, समोसा, बटाटावडा कोणत्याही तुमच्या आवडत्या पदार्थासह सांभार द्यावे

उरलेल्या कढीपासून बनवा टेस्टी डिश, करा चविष्ट ब्रेकफास्ट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT