अक्षय कुमारचे चित्रपट म्हणजे ते बॉक्स ऑफिसवर चांगले चालणार हे सगळ्यांनाच माहीत झाले आहे. निवडक चित्रपट दमदार करण्यात त्याचा चांगलाच हातखंडा आहे. पण पृथ्वीराज चौहान (Samrat Pruthviraj) या त्याच्या चित्रपटाने सगळा गोंधळ घातला आहे. पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास हा अंगावर काटा आणणारा असला तरी देखील हा चित्रपट सपशेल पडला. यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. अक्षय कुमारने(Akshay Kumar) यामध्ये पृथ्वीराजची भूमिका साकारली आहे. त्याचा हा चित्रपट पडल्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर याचा परिणाम होईल असे सांगितले जात आहे. पण पृथ्वीराज चित्रपट का पडला? यामागेही अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया या विषयी अधिक
अधिक वाचा: Khatron Ke Khiladi 12: ग्रँड प्रिमियर होणार लवकरच, प्रोमोला झाली सुरूवात
आवडला नाही का पृथ्वीराज
बरेचदा ऐतिहासिक चित्रपट हे चांगले चालतात असा अंदाज आहे. त्यानिमित्ताने आपला इतिहास कळतो त्यामुळे खूप जण कुटुंबासह असे चित्रपट पाहायला जातात. पण अक्षय कुमारच्या पृथ्वीराजच्या बाबतीत असे झालेले दिसत नाही. अनेकांना या चित्रपटात अक्षय कुमारचे काम आवडलेले दिसत आहे. ज्याप्रमाणे त्याने केसरीमध्ये काम केले किंवा ते पात्र त्याला शोभले पण हे पात्र अनेकांना आवडलेले दिसत नाही. इतकेच काय तर त्याचा अभिनय हा ओढून ताणून केल्यासारखा वाटतो असे देखील अनेकांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून हा एक सुपर फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटाने 5 कोटीच्यावरही कमाई केली नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे अक्षयच्या करिअरच्या दृष्टिकोनातून चित्रपट असा पडणे अजिबात चांगले नाही असे सांगितले जात आहे.
काही काळापासून चित्रपट होत आहेत फ्लॉप
सम्राट पृथ्वीराजच नाही तर या आधी आलेले ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ हे चित्रपटही बऱ्यापैकी फ्लॉप झालेत. त्यामुळे अक्षयचा हा काळ त्याच्यासाठी काही फारसा अनुकूल आहे असे दिसत नाही. लागोपाठ तीन चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर होईल असा अंदाज व्यक्त केला जात नाही. अशीही चर्चा आहे की, येणाऱ्या ‘धूम’ या चित्रपटात अक्षय कुमारची वर्णी लागणार होती. पण गेल्या काही चित्रपटांचे निकष पाहता त्याला या चित्रपटातून वगळ्यात आल्याचे कळत आहे. पण या बातमीवर कोणीही शिक्कामोर्तब केलेले नाही. पण फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे हे नक्की!
मानुषीचे करिअर सुरु होण्याआधी धोक्यात???
मिस वर्ल्डचा ताज आपल्या डोक्यावर घेऊन परतलेली मानुषी हे अनेकांचे आयडॉल आहे. अत्यंत सुंदर आणि हुशार अशा मानुषीचे करिअर या चित्रपटातून सुरु झाले. तिने केलेला अभिनय हा लोकांना आवडणारा असला तरी देखील तिला पाहण्यासाठी थिएटरमध्ये फारशी गर्दी झाली नाही. पडद्यावर सुंदर आणि सालस दिसूनही केवळ चित्रपट चांगला नाही यामुळे लोकांनी या चित्रपटाला जाणे टाळले. आता याचा परिणाम मानुषीच्या करिअर होईल की काय? असा प्रश्न आहे.
दरम्यान अक्षय संदर्भात उठलेली वावटळ किती खरी आहेत हे येत्या काळात कळेलच
अधिक वाचा: अनुष्का आणि विराट वेकेशनवरून घरी येताना का गेले होते हॉस्पिटलमध्ये, चाहत्यांना सतावतेय चिंता