धर्माचा खरा अर्थ कळल्यामुळे आता गरजवंताची सेवा करणार, अशी भली मोठी पोस्ट करत अभिनेत्री सना खान हिने इंडस्ट्रीला अलविदा केला होता. इन्स्टाग्रामवर ही बातमी पोस्ट केल्यानंतर अनेक जण नाराज झाले होते. आता सना खान इन्स्टावर काही पोस्ट करणार की नाही? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. पण अलविदा केल्याची घोषणा करुन दोन दिवस जात नाही तोच सना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती इस्लाम धर्मातील काही शिकवण देत आहे. पण हा व्हिडिओ अनेकांना खटकल्याचे दिसत आहे. सना खानने केलेला मेकअप अनेकांना खटकलेला दिसत आहे. त्यामुळेच की काय सना खान तिच्या या नव्या रुपात ट्रोल होऊ लागली आहे.
साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सझन, अहमचा असणार डबल रोल
मेकअपची शिकवण धर्माने दिली का?
सना खानने काही खासगी कारणातून फिल्म इंडस्ट्रीला सोडचिठ्ठी दिली. तिने इस्लाम धर्माचा खरा अर्थ कळला असून आता फक्त अल्लाहच्या सेवेत दिवस घालवायचे म्हटले आहे. एरव्ही ती कुराणातील दाखले हे तिच्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून देत असते. मंगळवारी तिने एक असाच व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने मेकअप केलेला स्पष्ट दिसत आहे. हा मेकअपच अनेकांना खटकलेला दिसत आहे. इस्लाम धर्मियांपैकीच काहींनी तिला कमेंट करत विचारले की, कुराणामध्ये मेकअप करायला परवानगी दिली आहे का? ही कमेंट केल्यानंतर तिच्या अनेक फॅन्सनी तिची बाजू घेतली आहे. त्यावर तिने कोणताही रिप्लाय दिलेला नाही.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नसोहळ्यातील आनंंदाचे क्षण, फोटो व्हायरल
डिलीट केले जुने फोटो
सना खान ही कायम बोल्ड अशा अवतारात दिसायची. बिग बॉसमध्येही तिचा हा अवतार दिसला होता. पण इस्लाम धर्माचा अधिक अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर तिने तिचा भूतकाळ मागे टाकायचे ठरवले. तिने तिचे सगळे जुने फोटो डिलीट करुन टाकले. तिच्या इन्स्टाग्रामवर आता असलेले फोटो हे फक्त इस्लाम धर्माला शोभतील असे आहे. ती पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये हिजाब आणि पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये सालसपणा झळकताना दिसतोय. ती कोणत्याही व्हिडिओमध्ये आक्रमक किंवा झालेल्या कोणत्याही गोष्टीमुळे चिडलेली दिसत नाही.
रिलेशनशीपमुळे आली चर्चेत
सना खानचे नाव डान्सरआणि कोरिओग्राफर मेलविन लुईससोबत जोडले गेले होते. मेलविन लुईससोबत तिचे रिलेशनशीप होते. पण हे नाते तुटल्यानंतर ती बरीच खचली होती. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. पण अचानक हा विषय थांबला. मेलविननेही त्याच्या अकाऊंटवर त्यानंतर कोणतीही पोस्ट केली नाही.त्यामुळे रिलेशनशीपची गोष्ट ही तिथेच थांबली होती. रिलेशनशीपमध्ये असताना मेलविनसोबत तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ होते पण तिने तिच्या खासगी अकाऊंटमधून हे फोटो आणि व्हिडिओज काढून टाकले.
आता राहिला प्रश्न तिच्या आताच्या व्हिडिओच्या ज्यामध्ये तिने मेकअप केला आहे. त्यावर सना खान काय उत्तर देईल ते पाहावे लागेल.
Good News: ‘विवाह’फेम अमृता राव लवकरच होणार आई, बेबी बंपसह फोटो व्हायरल