एक काळ असा होता संजय दत्त हा अभिनेता म्हणून नाही तर नशेच्या आहारी गेलेला आणि बिघडलेला मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्याला यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्ष गेली. आपण आयुष्यात घालवलेला तो काळ पुन्हा कधीही आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणूनच आता संजय दत्त स्वत: ड्रग्जच्या आहारी जाऊ नका असा सल्ला देताना दिसत आहे. आज World drug day च्या निमित्ताने त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने त्याची आपबीतीदेखील यातून सांगितली आहे.
संजय दत्तने का उचलली जबाबदारी
संजय दत्तने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंंवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओखाली एक छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने असे लिहिले आहे की, मी स्वत: ड्रग्जच्या आहारी गेलो होते. त्यामुळे आयुष्याचे काय होते हे मला माहीत आहे. म्हणूनच आता यातून बाहेर पडल्यानंतर ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये जनजागृती करणे माझी जबाबदारी आहे असे समजतो आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी शेअर करतो ज्यांना यातून बाहेर पडण्याची गरज आहे.
कार्तिक आर्यन- जान्हवी कपूर करणार ‘दोस्ताना’
क्योंकी सच मै जानता हूँ
संजय दत्तचा हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणा देणारा आहे कारण या व्हिडिओमध्ये त्याने जे सांगितले आहे तो त्याचा स्वानुभव आहे. तो या व्हिओमध्ये म्हणतोय की, मला माझे आई- वडील सांगत होते. पण मी त्यांच कधीच ऐकलं नाही. माझ्या मनाने देखील हे सगळे थांबव सांगितले पण तरीदेखील मी ऐकले नाही. मित्रांनी सांगितले एकदा ड्रग्ज घेऊन बघ काय होतयं असं तुम्हाला वाटत असेल तर असं एकदा केल्यानंतर ते करण्याची सवय लागते. हे सगळ्यात चांगल मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याला वेळीच नाही म्हणा.. असे तो म्हणाला आहे.
वाचा – जागतिक तंबाखू विरोधी दिन, जाणून घ्या याबद्दलची संपूर्ण माहिती
पाहा नेमकं काय म्हणाला संजय दत्त
नुकताच ‘संजू’मधून मांडला जीवनप्रवास
संजय दत्तचा बायोपिक नुकताच येऊन गेला. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. यातील त्याच्या ड्रग्ज सवयीपासून ते 1993 च्या बॉम्बस्फोटात हत्यार बाळगल्याच्या आरोपाखाली असलेला संजय दाखवण्यात आला. लोकांनी या बायोपिकवर अनेक टीकादेखील केली. कोणतेही कर्तृत्व किंवा समाजाला काही चांगले देऊ न शकलेल्या संजय दत्तच्या जीवनावर बायोपिक कशाला? असे लोकांनी म्हटले होते. पण संजय दत्तला जगासमोर त्याची बाजू मांडायची होती. ती त्याने या चित्रपटातून मांडली.
नीना गुप्ताचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिला का?
मुन्नाभाईनंतर बदलली प्रतिमा
संजय दत्तने त्याच्या तरुणपणात रॉकी, नाम,सडक,साजन, खलनायक हे त्याचे काही गाजलेले चित्रपट.. पण त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट दिला तो ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाने कारण या चित्रपटामध्ये त्याने केलेली गांधीगिरी लोकांना जास्तच भावली. या एका चित्रपटानंतर लोकांनी त्याला पुन्हा स्विकारले. त्यामुळे हा चित्रपट त्याच्या अगदी जवळचा आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे या चित्रपटात संजय दत्तच्या वडिलांनी म्हणेच सुनील दत्त यांनी काम केले होते. या चित्रपटात जेव्हा ते दोघं एकमेकांना मिठी मारतात तेव्हा सुनील दत्त आणि संजय दत्त खरेच रडले होते.
आज World drug day च्या निमित्ताने ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांनी एकदा तरी त्यांचा आपल्यामुळे इतरांना किती त्रास होतो याचा एकदा विचार करावा.