संजय दत्तच्या आयुष्यात एका नवीन मुलीची एंट्री झाली आहे. त्यामुळे आता संजय- मान्यता यांच्या संसारात ‘दोघात तिसरा’ आल्याचे म्हटले जात आहे. कारण संजय दत्तचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नव्या मुलीचे नाव पूजा आहे. पण थोडं थांबा ही केवळ एक अफवा आहे बरं का! कारण खरं प्रकरण तर काहीतरी वेगळं आहे. जाणून घ्या संजय दत्तच्या या व्हिडिओमागील सत्य कारण ते तुम्ही वाचलं नाही तर तुम्हाला खरं काय ते कळू शकणार नाही आणि हा विषयही गॉसिप बनून राहील.
OMG:सुरवीन चावलाची 5 महिन्यांच्या मुलीने केला डेब्यू
व्हायरल व्हिडिओमागील सत्य
आता हा व्हिडिओ कोणी शेअर केला असा विचार पडला असेल तर हा व्हिडिओ मालिका क्वीन एकता कपूर हिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त फोनवर पूजा नावाच्या मुलीशी गोड-गोड बोलताना दिसत आहे. पण ज्यावेळी त्याला कळतं की, त्याचा व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड करतयं त्या क्षणी ती तो बोलणं थांबवतो. पण आता हा अभिनय आहे हे सांगायला काहीच हरकत नाही. कारण या व्हिडिओमागे प्रमोशन असल्याचे सांगितले जात आहे.
नेमका कोणत्या कारणावरून वाद आहे सुशांत आणि सारामध्ये
ड्रिम गर्लचे करतोय प्रमोशन
आता तुम्हाला ही गोष्ट कळलीच असेल की, हा व्हिडिओ एक प्रमोशनचा भाग आहे आता हे प्रमोशन ड्रिम गर्ल या चित्रपटाचे असून या चित्रपटात आयुषमाा खुराना यामध्ये एक कॅरेक्टर करत आहे ते मजेशीर आहे. तो महिलांच्या आवाजात फोन करुन बोलत असतो. त्याचाच प्रयत्न संजू बाबाच्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ड्रिम गर्ल हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. एकता कपूरचा हा चित्रपट असल्यामुळेच तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा HOT Makeover
कलंकमध्ये दिसला होता संजूबाबा
संजू बाबा सध्या अनेक समाजोपयोगी काम करतो. कारण त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर अनेक व्हिडिओ तो शेअर करत असतो. संजू बाबा नुकताच धर्मा प्रोडक्शनच्या कलंक या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याची भूमिका महत्वाची होती. त्यानंतर त्याचा एकही चित्रपट आला नाही. पण त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. पानिपत, सडक2, सशमेरा असे काही चित्रपट त्याच्याकडे आहेत . त्यामुळे आता तो फारच बीझी आहे. त्याचे काही दर्जेदार चित्रपट फ्लोअरवर येणार आहे. संजू या त्याच्या बायोपिकनंतर त्याची किंमत पुन्हा वाढली असून त्याला आता चांगले चित्रपट ऑफर होऊ लागले आहेत.
पण प्रमोशनसाठी कुछ भी
आता चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. हाच प्रयत्न संजय दत्तने या चित्रपटाबाबत केला आहे. त्याचा हाच व्हिडिओ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. जो तो या व्हिडिओची चर्चा सध्या करत आहे आणि संजय दत्तचे अफेअर असल्याचे सांगत आहे.
मान्यतासोबतच खूष
मान्यता सोबत संजूने 2008 साली लग्न केले. या दोघांना जुळी मुलं असून त्यांचा सुखी संसार सुरु आहे.
आता पूजा ही आणखी कोणी नसून एक प्रमोशन फंडा आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.