ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
संजय दत्तने लाँच केले प्रोडक्शन हाऊस थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्स

संजय दत्तने लाँच केले प्रोडक्शन हाऊस थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्स

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री निर्माते देखील होत आहेत. स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु करून वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती करायची असे अनेक अभिनेत्यांनी याआधी देखील केले आहे. जवळजवळ प्रत्येक अभिनेत्याचे  किंवा अभिनेत्रींचे  एकतर चित्रपट निर्मित करण्यााचे किंवा दिग्दर्शित करण्याचे स्वप्न असते. त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात व त्यापैकी अनेक यशस्वी देखील होतात. नुकतेच प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याची घोषणा केली आहे. संजय दत्तने थ्री डायमेन्शन मोशन पिक्चर्स नावाचे  स्वतःचे प्रोडक्शन हाऊस लाँच केले आहे. या प्रोडक्शन हाऊसद्वारे उत्तम चित्रपट निर्माण करून हिंदी चित्रपटसृष्टीत वीरतेचा व शौर्याचा सुवर्णकाळ परत आणण्याचे  उद्दिष्ट असल्याचे संजय दत्तने म्हटले आहे.  

अधिक वाचा – Mermaid In M-Town! रीना मधुकरने केलेलं हे अंडरवॉटर फोटोशूट पाहाच…

हिंदी चित्रपटसृष्टीला लार्जर दॅन लाईफ हिरोची गरज  

अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत वावरणारा व  अनेक हिट चित्रपट देणारा संजय दत्त हा नव्या पिढीतील अभिनेत्यांसाठी व अभिनेत्रींसाठी आता वयाने व अनुभवाने देखील ज्येष्ठ झाला आहे. तो म्हणाला की, पुष्पा आणि बाहुबली सारखे दक्षिणेतले चित्रपट संपूर्ण भारतात यशस्वी होत आहेत. या चित्रपटांनी संपूर्ण भारतातच धुमाकूळ घातला आहे. याचे कारण असे की या चित्रपटात लार्जर-दॅन-लाइफ हिरो दाखवले आहेत.  “जेव्हा आम्ही चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतीही वीरता, वीरतापूर्ण भूमिका, सामूहिक प्रेम अश्या सर्व गोष्टी सुरु होत्या. आम्हीही ते केले.  परंतु सध्या असे चित्रपट हिंदीत बनताना फारसे दिसत नाहीत  आणि  माझ्या प्रोडक्शन हाऊसमधून मी ते पुनरुज्जीवित करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.” 

अनेकांच्या आवडीचा मुन्नाभाई  आज 62 वर्षांचा आहे यावर विश्वास बसत नाही. संजय दत्तने 1981  मध्ये आलेल्या ‘रॉकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने एक काळ गाजवला होता. सडक, साजन मधील त्याची हेअरस्टाईल त्यावेळी अनेकांनी कॉपी केली होती. ज्यावेळी संजय दत्त फॉर्ममध्ये होता ते 80 आणि 90 चे दशक असे होते जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या हिरोजना चित्रपटांतून एक संपूर्ण पॅकेज म्हणून दाखवले जात असे.  आज संजय दत्तला असे  वाटते की त्या प्रकारचे चित्रपट हल्ली फार कमी तयार होतात. हल्ली हिरोला एक सामान्य व्यक्ती म्हणून दाखवण्याचे प्रमाण जास्त आहे. चित्रपटांचे विषयच हल्ली काळानुसार खूप बदलले आहेत. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – “माझं नाव त्यांनीच ठेवलं होतं “-अभिनेता नील नितीन मुकेशने शेअर केली लतादीदींची आठवण 

द व्हर्जिन ट्री

थ्री डायमेंशन सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांची तयारी करत आहे. या प्रोडक्शन हाऊसद्वारे द व्हर्जिन ट्री हा चित्रपट तयार होतोय. ही एक हॉरर-कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  सिद्धांत सचदेव करत आहेत. या चित्रपटात चार नवोदित कलाकार दिसणार आहेत.  थ्री डायमेन्शनच्या उर्वरित चित्रपटांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही परंतु ते फॅमिली ड्रामा तसेच ऍक्शन चित्रपट असतील असा अंदाज आहे.  दरम्यान, संजय दत्त सध्या पृथ्वीराज, शमशेरा आणि KGF: Chapter 2 या चित्रपटांमध्ये बिझी असून हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होतील. 

सुनील शेट्टी व संजय दत्त करणार पडद्यावर धमाल  

संजय दत्त आणि सुनील शेट्टी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत . यापूर्वी त्यांनी कांटे, दस अनु शूटआऊट  ऍट  लोखंडवालासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले आहे. आता बऱ्याच वर्षानंतर ते एका कॉमेडी चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर कर्णिक करणार आहेत. कर्णिक यांनी यमला पगला दिवाना हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.  

अधिक वाचा – सुनिल ग्रोव्हरच्या उपचारांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

08 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT