Advertisement

मनोरंजन

सुरू होतोय नवा कुकरी शो, किचनमध्ये कलाकारांसोबत कल्ला करणार संकर्षण कऱ्हाडे

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Nov 23, 2021
Sankarshan Karhade Host Cooking Based Reality Show Kitchen Kallakar in Marathi

Advertisement

टीव्ही शो, युट्यूब वर रेसिपी पाहून आणि तिथे दिलेल्या किचन टिप्स फॉलो करून तुम्ही आजवर अनेक पदार्थ बनवले असतील. त्यामुळे पुरूष असो वा महिला स्वयंपाकाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला कुकरी शोज नक्कीच आवडतात. प्रेक्षकांची आवड जपत बऱ्याचदा असे शो वाहिन्यांवर सुरू केले जातात. आपल्या सर्वांची आवडती मराठी वाहिनी झी मराठीवर देखील लवकरच असा एक नवा कोरा मराठी कुकरी शो सुरू होत आहे. या शोमधून तुमचे आवडते कलाकार स्वयंपाक करताना काय काय कल्ला करतात हे सर्वांसमोर येणार आहे. 

प्रियंका चोप्राने सोशल मीडिया अकाउंटवरून का काढलं जोनस आडनाव

देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणारा चित्रपट- अजिंक्य

काय आहे हा कुकरी शो

झी मराठी वाहिनीवर सध्या एक प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे… या शोचं नाव आहे ‘किचन कल्लाकार’ या नवीन कुकरी शोचं अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करणार आहे. या प्रोमोमध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, “आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार”  यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये स्वयंपाक करताना कस लागणार आहे. त्यामुळे संकर्षणसोबत आता हे कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

आलिया भट झाली ट्रोल, कारण ऐकून व्हाल हैराण

कधी सुरू होणार किचन कल्लाकार 

किचन कल्लाकार हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेतच. पण सध्या या शोची रचना कशी आहे, संकर्षण सोबत अजून या शो मध्ये कोण असणार, कोणकोणते कलाकार काय काय पदार्थ करून दाखवणार, रेसिपीसोबतच या कलाकारांची आणखी आणखी कोणकोणती किचन स्किल्स पाहायला मिळणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. मात्र याबाबत काहीच माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र संकर्षणला या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आणि नेहमीच्या कुकरी शोपेक्षा हा शो थोडा हटके असणार यात नक्कीच शंका नाही. झी मालिकेतील ती परत आलीय ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे त्या जागी आता आणखी एखादी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. या जागी देवमाणूस मालिकेचा दुसरा सीझन अथवा किचन कल्लाकार हा नवा कोरा कुकरी शो सुरू होण्याची शक्यता आहे. झी मराठीवरील मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी हा नवा शो सुरू होणार अशीही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र संकर्षणला नव्या भूमिकेत पाहायला चाहते नक्कीच उत्सुक आहेत. सध्या संकर्षण तुझी माझी रेशीमगाठ मधून चाहत्यांची मने जिंकून घेत आहे आता आणखी या नव्या कुकरी शोमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.