ADVERTISEMENT
home / मनोरंजन
संस्कृती करणार सूत्रसंचाल

आणखी एक मराठी अभिनेत्री खूप वर्षांनी दिसणार छोट्या पडद्यावर

 मनोरंजन विश्वासा धक्का कोरोनाचा फार मोठा धक्का बसल्यापासून अनेक गोष्टी ठप्प झाल्या आहेत. चित्रपट रिलीज होत नसल्यामुळे अनेक कलाकार हे विनाकामाचे आहेत. त्यामुळे खूप जणांनी वेबसीरिज आणि अन्य वेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांनी आपले काम सुरु ठेवले आहे. तर अनेकांनी मालिकेचा मार्गही स्विकारला आहे. मालिकांमधून अनेक मोठ्या कलाकारांनी कमबॅक करायला सुरुवात केली आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना पाहिल्यानंतर आता आणखी एक नवा चेहरा यामध्ये पाहायला मिळणार आहे.तब्बल 8 वर्षांनी संस्कृती बालगुडे ही छोट्या पडद्यावर येणार आहे.

करणार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

संस्कृती बालगुडेने आतापर्यंत चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता संस्कृती बालगुडे एका नव्या रुपात सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 8 वर्षांनी ‘मी होणार सुपरस्टार..’ हा एक कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहेत. या नव्या शो साठी ती सज्ज झाली असून त्या शोचे सूत्रसंचालन ती करणार आहे.  या नव्या रुपात तिला पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक झाले आहेत. स्टार प्रवाहसोबत ती पहिल्यांदाच या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

हृता दुर्गुळे परत येतेय, नवी मालिका नवा लुक

नवा डान्स रिअॅलिटी शो

 मी होणार सुपरस्टार…. जल्लोष डान्सचा असा हा रिअॅलिटी शो असून या रिअॅलिटी शोमध्ये वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याविषयी सांगताना संस्कृतीने सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भन्नाट टॅलेंटेड डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. नृत्य ही माझी पहिली आवड आहे आणि अशा शोचा मला एक भाग होता आले याचा मला आनंद आहे. हा मंच प्रत्येकाला नवी उर्जा देणारा आहे. त्यामुळे हा नवा शो पाहावा लागेल.

ADVERTISEMENT

मराठमोळा अभिनेता घेऊन येत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म

श्रेयस तळपदे- प्रार्थना दिसणार एकत्र

मालिका म्हटले की, काही खास जोड्या आपल्या डोळ्यांसमोर येतात. या अशा काही जोड्या असतात त्यांनी काही मालिकांमध्ये काम केल्यानंतर ही जोडी कायमच लोकांच्या लक्षात राहते. अशीच एक नवी जोडी लवकरच तयार होत आहे. झी मराठीवर एक ‘तुझी माझी रेशीम गाठ’  ही मालिका नव्याने येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे अशी जोडी पाहायला मिळणार आहे. या जोडी चर्चाही आता जोरदार होऊ लागली आहे. ही फ्रेश जोडी सगळ्यांचे मन जिंकून घेणार आहे यात काहीही शंका नाही. 

हिरोची एन्ट्री झाली’ म्हणत उर्मिला निंबाळकरने शेअर केली खुशखबर

आणखी मालिका येणार

झी मराठीवर आणखी काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन लक्षात घेता काही जुन्या मालिका या कायमचा निरोप घेणार असल्याचेही कळत आहे. काही मालिकांनी आताच अचानक युटर्न घेतला आहे. तर काही मालिकांनी हळुहळू शेवटच्या भागाकडे जायला सुरुवात केली आहे. मनोरजंनाची खुमासदार फोडणी लावण्यासाठी काही नव्या मालिका येणार असल्याचा आनंदही प्रेक्षकांना आहे. 

ADVERTISEMENT

आता या सगळ्यात संस्कृतीचा हा नवा लुक पाहणे खूपच औत्सुक्याचा ठरणार आहे.

09 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT