बॉलीवूड अभिनेत्रा सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा पहिला चित्रपट यायच्या आधीपासूनच ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. करण जोहरच्या चॅट शो मध्ये कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं साराने तिच्या वडिलांसमोर सांगितलं होतं. त्यानंतर या जोडीने एकत्र काम करावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. कार्तिक आणि साराची जोडी घेऊन इम्तियाज अली चित्रपट घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं. कार्तिक आणि सारा त्यानंतरही एकमेकांबरोबर नेहमी दिसत होतं. तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की, सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत आहेत. कारण साराच्या वाढदिवसाच्या दिवशीदेखील कार्तिक तिच्याबरोबर होता. त्याशिवाय बऱ्याचदा एकमेकांना रिसिव्ह करण्यासाठीही दोघं विमानतळावर दिसत होते. पण सारा आणि कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या दोघांचं ब्रेकअप झालं असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. पण याचं नक्की काय कारण आहे अशीही सध्या चर्चा रंगली आहे.
काय आहे ब्रेकअपचं कारण?
वास्तविक सारा आणि कार्तिकने आजकल या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर वेगळ्या चित्रपटांसाठी शूटिंग सुरू केलं. कार्तिक आपला जास्तीत जास्त वेळ हा ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात लखनौमध्ये व्यस्त होता. तेव्हा सारा त्याला भेटायला लखनौमध्ये गेली होती. त्यावेळी या दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. तसंच सारा जेव्हा कुली नं. 1 या चित्रपटाच्या बँकॉकमधील चित्रिकरणासाठी कार्तिकही तिला भेटायला गेला होता. पण या दोघांच्या व्यस्त शेड्युलमुळे आता दोघांनाही एकमेकांना वेळ देता येत नाहीये. त्यामुळे या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारा आणि कार्तिक हे दोघेही त्यांच्या करिअरच्या चांगल्या टप्प्यावर आहेत. इम्तियाज अलीच्या चित्रपटाच्या शूटिंगनंतर बऱ्याच प्रयत्नानंतरही दोघंही आपल्या व्यग्र आयुष्यातून एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. दोघांनाही एकमेकांबरोबर अजिबातच वेळ मिळत नसून वेळ काढणं कठीण झालं आहे. त्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असण्याचं सांगण्यात येत आहे.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट
कार्तिक आणि सारा दोघेही व्यग्र
सारा अली खान सध्या वरूण धवनबरोबरील ‘कुली नं. 1’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 1 मे 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कार्तिक सध्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट याचवर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये कार्तिकबरोबर अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरदेखील दिसणार आहेत. तसंच कार्तिक ‘भुलभुलैया 2’ चित्रपटाचं शूटिंगदेखील सध्या करत आहे. याशिवाय हे चित्रीकरण संपल्यानंतर कार्तिक लगेचच करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे या सगळ्यातून खासगी आयुष्यात वेळ देणं या दोघांनाही शक्य होत नसून दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याआधी कार्तिकचं नाव अनन्या पांडेबरोबरही जोडण्यात आलं होतं. पण आपण केवळ मित्र असल्याचं दोघांनीही स्पष्ट केलं होतं. तर साराबरोबरच्या नात्याबद्दल सारा आणि कार्तिकने कधीही खुलासा केला नाही.
सारा आणि कार्तिकमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय… फोटो आहेत पुरावा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.