ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कोणाच्या आठवणीने व्याकूळ झाली सारा अली खान, शेअर केले फोटो

कोणाच्या आठवणीने व्याकूळ झाली सारा अली खान, शेअर केले फोटो

सारा अली खानने सध्या चाहत्यांच्या मनावर गारूड घातलं आहे. तिचं अतरंगी चित्रपटातील चकाचक गाणं खूपच व्हायरल होत आहे. अनेकांनी या गाण्यावर ठेका धरत सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरूवात केली आहे. केदारनाथ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने पाहता पाहता कधी चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले हे कळलं सुद्धा नाही. सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सारा अली खानला फिरण्याचीदेखील खूप आवड आहे. मालदिव्जच्या समुद्रकिनारी अथवा बर्फाळ डोंगरमाथ्यावर वेकेशनवर जाणं तिची पहिली पसंती आहे. मात्र ती नववर्षाच्या सुरूवातीसाठी यंदा कुठेच वेकेशनवर गेली नाही. त्यामुळे तिने तिचे वेकेशनचे थ्रोबॅक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काजल अगरवाल होणार आई, सोशल मीडियावर केले शेअर

सारा मिस करतेय डोंगरमाथ्यावर भटकंती

साराने तिच्या इन्स्टावर वेकेशनचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती मस्त डोंगरमाथ्यावर भटकंती करताना दिसत आहे. डोंगराजवळ निरनिराळया पोझमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत. हे डोंगर बर्फाळ असून ती काश्मिर वेकेशनवर गेली असतानाचे हे फोटो आहेत. मित्रमंडळींसोबत मौजमस्ती करण्यासाठी तेव्हा सारा काश्मिरला गेली होती. सध्या साराला काश्मिरच्या ट्रिपची आणि या डोंगरमाथ्याची, सूर्यप्रकाशाची खूप आठवण येत आहे. साराने शेअर केलं आहे की, ‘मी डोंगरांना खूपच जास्त मिस करत आहे. सर्वात जास्त मला सनकिसिंगची आठवण येत आहे’ साराचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामुळे साराच्या या पोस्टवर चाहत्यांनी कंमेटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

अनुष्का शर्मा करतेय कमबॅक,नववर्षात लागोपाठ येणार तीन बिग बजेट चित्रपट

ADVERTISEMENT

साराच्या ‘चकाचक’ गाण्याचा ट्रेंड

सारा अली खान नुकतीच ‘अतरंगी रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुषच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाती चकाचक हूं मै हे गाणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. सध्या ती लुका छुपी 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत असेल. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

अंकुश, वैदेही, सिद्धार्थचा ‘लोच्या झाला रे’

04 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT