टेलीव्हिजन मालिका आणि प्रेक्षक हे एक अतूट नातं सध्या निर्माण झालं आहे.मालिकांमधील पात्र प्रेक्षकांना आपल्या कुटुंबातील मंडळीप्रमाणे वाटू लागतात. मालिकांमधील सुख-दुःखामध्ये चाहते जवळच्या लोकांप्रमाणे सहभागी होतात. सहाजिकच त्यामुळे वाहिन्यांवर हटके विषयांवरील मालिकासाठी स्पर्धाच सुरू असते. निरनिराळ्या वाहिन्या निरनिराळे विषय घेऊन मालिका निर्माण करत असतात. मालिकांच्या या स्पर्धेमध्ये आणखी एका नवीन मालिकेची भर पडली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून साथ दे तू मला ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत आशुतोष कुलकर्णी आणि प्रियांका तेंडुलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. फॅशन डिझानरचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या स्वप्नाला पूर्ण करू पाहणाऱ्या मुलीची ही कहाणी आहे. लग्नानंतर करिअरच्या मागे धावताना सुद्धा घर आणि संसार उत्तम सांभाळाऱ्या महिलांची ही प्रतिनिधित्व करते. प्राजक्ताच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात तिला तिच्या कुटूंबाची आणि नवऱ्याची साथ कशी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
आशुतोष आणि प्रियांकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
प्रियांका तेडोंलकर पहिल्यांदाच या मालिकेतून प्रमुख भूमिकेतून दिसणार आहे. यापूर्वी प्रियंकाने ‘फुलपाखरू’ मालिकेमध्ये काम केलं आहे. मानस आणि वैदेहीच्या मैत्रिणीची भूमिका त्यात तिने केली होती. आशुतोष कुलकर्णीने देखील अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम केले आहे. आशुतोष आणि प्रियांकादेखील पहिल्यांचा एकत्र काम करत आहे. या मालिकेत ते दोघं पती-पत्नी या भूमिकेत असल्याने त्यांचा ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येणार आहे. आशुतोष आणि प्रियांकाच्यासोबत या मालिकेमध्ये सविता प्रभुणे, प्रिया मराठे, रोहन गुजर, पियुष रानडे, अरुण नलावडे, मेघना वैद्य, दीपक करंजीकर, अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा पोखरणकर, ऋचा आपटे, अनिल रसाळ, रोहन पेडणेकर, वैभव राजेंद्र असे अनेक कलाकार दिसणार आहेत.या मालिकेचे दिग्दर्शन जालिंदर कुंभार करत आहेत. यापूर्वी का रे दुरावा, अनुबंध, लज्जा या लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालिंदर कुंभार दिग्दर्शित सर्वच मालिका आतापर्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळे या मालिकेकडून प्रेक्षकांना जास्त अपेक्षा वाटत आहेत.
दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत गेली होती डेटवर
अभिनेता दिलीप कुमार यांची नात ‘साएशा सेहगल’ अडकली विवाहबंधनात
‘खतरों के खिलाडी’चा विजेता पुनीत, आदित्यने जिंकलं प्रेक्षकांचं मन
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम