साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त अशी अक्षय्य तृतीयेची ओळख आहे. यंदा हा दिवस 3 मे 2022 रोजी आला आहे. या खास दिवसासाठी अनेकांचे काही प्लॅन असतात. अनेक चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या जातात. लग्नाचे, गृहप्रवेशाचे, साखरपुडा, डोहाळजेवण, नवीन वाहन खरेदी, सोनं खरेदी यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेचे महत्व जाणून आपण या दिवशी घरात देवांची पूजा करतो. या दिवशी विष्णू देवाची पूजा करणे फार शुभ मानले जाते. विष्णूची पूजा करताना त्याच्या आवडीचा असा प्रसाद दाखवणेही तितकेच गरजेचे आहे. खूप ठिकाणी या दिवशी सत्तूच्या पीठाचे लाडू केले जाते. सातू हे अत्यंत पौष्टिक मानले जाते. त्यापासून तयार केलेले लाडू हे अधिक पौष्टिक असतात हे काही सांगायला नको. चला जाणून घेऊया अक्षय्य तृतीया स्पेशल सातूचे लाडू
असे तयार करा सातूचे पीठ
बाजारात सातूचे पीठ विकत मिळते. पण ते घरी करणेही तितकेच सोपे आहे. सातूच्या पिठासाठी तुम्हाला गहू, चणा डाळ आणि जिरे भाजून घ्याये आहे. त्याचे चांगले बारीक पीठ काढून घ्यायचे आहे. तुमचे सातूचे पीठ तयार केले जाते. त्यामुळे घरी देखील तुम्ही हे पीठ तयार करु शकता. तुमच्या आप्तेष्टांना द्या अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.
असे बनवा सातूच्या पीठाचे लाडू
सातूच्या पीठाचा लाडू बनवणे फारच सोपे आहे. हा लाडू तुम्ही कधीही खाऊ शकता. या शिवाय अक्षय्य तृतीयेची माहिती देखील जाणून घ्या
साहित्य: सातूचे पीठ, गूळ, तूप, वेलदोडा पूड आणि आवडीचे ड्राय फ्रुट
कृती :
तूपात सातूचे पीठ चांगले भाजून घ्या. ते खाली उतरुन त्यामध्ये गूळ किसून घाला.
आवडीचे ड्राय फ्रुट घालताना ते थोडे भाजून घ्या त्यानंतर टाका
ते तुपात भाजले तर आणखी चांगले लागतात.
सगळ्यात शेवटी वेलदोडा पूड घालून सगळे साहित्य एकत्र करा. जर तुपाची गरज लागली तरच त्यामध्ये तूप घालून लाडू वळून घ्या.
तुमचे सातूचे लाडू तयार करा.
अशी करा विष्णूची पूजा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विष्णूची पूजा केल्यामुळे त्याचा जास्त लाभ मिळतो असे सांगितले जाते. भगवान विष्णू हे सृष्टीचे संरक्षक आहेत हे आपण जाणतो. याच कारणामुळे त्यांची पूजा या दिवशी अगदी आवर्जून केली जाते. पुराणातही असे काही दाखले आहेत ज्यामध्ये भगवान विष्णू स्वयं येऊन आपल्याला आशीर्वाद देतात असे सांगितले आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी अनेक जण विष्णूची पूजा करुन उपवास देखील करतात. अशावेळी खास भोजन केेले जाते. या दिवशी गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही सातूचे लाडू बनवू शकता आणि ते लाडू इतरांना देऊ शकता.
इतर वेळीही तुम्हाला सातूचे लाडू बनवता येतील.