लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार “बस्ता” (Basta Cinema) चित्रपटातून ३ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मीडिया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी “बस्ता” चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव (Sayli Sanjeev) या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही.
(वाचा : ‘थ्री इडियट्स’मधला मिलीमीटर ‘या’ मराठी सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत)
‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित
सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायलीचा ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. यामध्ये ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम सुहृद वार्डेकरचीही मुख्य भूमिका आहे. सुहृद आणि सायली यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून पसंतची पावती मिळवली आहे. दोघेही पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ या चित्रपटातून नात्यांच्या अनेक बाजू आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आपली किंवा परकी असा भेदभाव न करता प्रत्येक नात्यात मायेची, प्रेमाची भावना असते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे.
(वाचा : ‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित,सुहृद वार्डेकर-सायली मुख्य भूमिकेत)
सायली संजीव आणि सुहृद यांच्यासह गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिले आहे. गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुद्ध वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे. ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ 14 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
(वाचा : फॉरेनची फॅन ! माधव देवचकेला कुवेतवरून भेटायला आली चाहती)
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.