सासू आणि सून हे असे नाते आहे की ते जगजाहीर आहे. पण बऱ्याच ठिकाणी सासू आणि सुनांचं नातं हे अगदी आई – मुलीपेक्षाही अधिक चांगले दिसून येते. तुमचे तुमच्या सासूशी कितीही चांगले नाते असले तरीही काही गोष्टी या सासूसह चर्चा करणे योग्य नाही. सासरी गेल्यानंतर अनेक नाती ही अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे सावधानतापूर्वक ही नाती जपावी लागतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या सासूसह बोलल्यास, तुमचे आणि सासूचे नाते खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही संवेदनशील विषयांवर योग्य परिस्थिती हाताळण्याचे काम हे सुनेलाच करावे लागते. अशा गोष्टी नक्की गोष्टी आहेत, ज्यांची चर्चा तुम्हीही कधीही सासूसह करू नये हे जाणून घ्या.
सासूने दिलेला सल्ला कामाचा नसल्यास (If You Don’t Like Advice From MIL)
घरातील मोठ्या व्यक्तींना न विचारता सल्ला देण्याची खूपच सवय असते. विशेषतः सासूला. प्रत्येक लहानसहान गोष्टीत सासूला सल्ला देण्याची सवय असते. अनेक गोष्टींवर सुनेला सासूचा सल्ला मिळत असतो. तुमचीही सासू तुम्हाला सल्ला देतच असेल. पण बरेचदा तुम्हाला सासूचा सल्ला पटतोच असं नाही. पण असं असतानाही तुम्ही गप्प राहणं अधिक योग्य आहे. कारण यावर तुम्ही काहीही सांगायला गेल्यास अथवा कोणतेही उत्तर दिल्यास, तुम्हालाच उद्धट समजले जाते. त्यामुळे उगीच परिस्थिती बिघडवण्यापेक्षा तुम्ही कोणतीही चर्चा न करता तो सल्ला केवळ ऐकून घ्या.
सासूने बनवलेले जेवण न आवडल्यास (If You Don’t Like Food)

प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं जेवण अधिक आवडतं. पण सासूच्या हातचं जेवण तितकंसं आवडत नाही. पण तुम्ही त्यांच्या तोंडासमोर तसं सांगितल्यास नक्कीच त्यांना दुःख होईल. त्यामुळे त्यांनी बनवलेले जेवण न आवडल्यास, तुम्ही कधीही तोंडावर सांगू नका. एखाद्या वेळी आग्रह झाला आणि तुम्हाला जेवण जातच नसेल तर वेगळ्या आणि सौम्य पद्धतीने तुम्ही नकार द्या अथवा जेवणाबाबत तुम्ही सासूला सांगा. पण सहसा याबाबत चर्चा करणे टाळा.
सासूची एखादी सवय आवडत नसल्यास (If You Don’t Like Habit)
आपल्या सासूच्या एखाद्या सवयीपासून आपल्याला त्रास होणे अथवा सासूच्या काही वागण्याचा त्रास होणे अत्यंत सामान्य आहे. एकाच घरात जेव्हा तुम्ही खूप काळ राहता तेव्हा तुम्हाला यामुळे नक्कीच त्रास होऊ शकतो. आपल्याला सर्वांनाच काही गोष्टीमध्ये खासगीपणा लागतो. पण सासू बरेचदा हा खासगीपणा जपू देत नाही. सासूची कोणतीही सवय आवडत नसेल तर तुम्ही ती गोष्ट 10 लोकांसमोर न मांडणंच योग्य आहे. कारण तसे केल्यास, तुमच्या दोघींमध्ये भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या भावना अशावेळी मनातच ठेवणे योग्य आहे.
सासूबरोबर वेळ घालवणे आवडत नसल्यास (No Time to Spend)

अनेक महिलांना आपल्या सासूपेक्षा आईबरोबर वेळ घालवणे अधिक आवडते. पण अनेकदा मनात नसतानाही सासूसह बाहेर जावे लागते. पण अशावेळी आपल्या वागण्यातून ते दाखवून देऊ नका अथवा तुमच्या बोलण्यातून तसं दिसून आल्यास, तुमच्या नात्यात नक्कीच फरक पडेल. त्यामुळे सासूला दुःख होईल असं वागू नका. तसंच तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्यास जर 10 वेळा नकार दिला असेल तर किमान 1-2 वेळा तरी त्यांना घेऊन जाणे योग्य आहे.
सेक्स लाईफबाबत (About Sex Life)
काही सासू आणि सुनांचे नाते खूपच सुंदर असते. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करणाऱ्या सासू – सुनाही दिसून येतात. पण आपल्या मनातील गोष्टी गरजेपेक्षा अधिक सासूला नक्कीच सांगू नये. विशेषतः तुमच्या सेक्स लाईफबाबत. बेडरूममध्ये होणाऱ्या गोष्टीबाबत केवळ आपल्या जोडीदारासहच बोलावे. जर तुमच्या जोडीदाराला मंजूर असेल तरच तुम्ही याबाबत कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी चर्चा करू शकता. कारण सासूबरोबर याबाबत बोलणे योग्य नाही.
या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जेणेकरून तुमचे तुमच्या सासूसह नाते टिकून राहील आणि तुमच्या नात्यात कोणतीही बाधा येणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक